खडसेंच्या विषयावर शहांनी बोलणे टाळले
पुणे, दि. 05 - एकनाथ खडसे यांच्याविषयी कोणतेही भाष्य पुण्यात भाजपच्या कौशल्य विकास कार्यक्रमासाठी आलेले भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केले नाही. त्यांनी मोदी सरकारच्या विकास कामांचे दाखले आपल्या संपूर्ण भाषणात दिले.
देशातील करोडो युवकांना भाजपला सोबत घ्यायचे आहे. मागच्या 68 वर्षात झाली नाही ती, कामे मोदी सरकारने दोन वर्षात करुन दाखवली असा दावा भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केला. पुण्यात भाजपच्या कौशल्य विकास कार्यक्रमात ते बोलत होते. 2015 मध्ये कोळसा, वीज, कृषी क्षेत्रात मोठया प्रमाणावर उत्पादन झाले. युवकांसाठी स्टार्ट अप इंडिया, मेक इन इंडिया, मुद्रा बँक अशा अनेक योजना आणल्या. तीन कोटी पेक्षा जास्त गॅस जोडण्या दिल्या. देश मजबूत हातांमध्ये सुरक्षित आहे. 750 परदेशी कंपन्या भारतात कारखाने सुरु करत असून, त्यामुळे मोठया प्रमाणावर रोजगार निर्माण होणार आहे असे त्यांनी सांगितले.