मेट्रो आता ठाणे-भिवंडी-कल्याण मार्गावर धावणार?
मुंबई, दि. 02 - ठाणे-भिवंडी-कल्याण मार्गावर आगामी काळात मेट्रो रेल्वे धावण्याची शक्यता असून कारण या मार्गावर एमएमआरडीएने केलेल्या सर्वेक्षणात मेट्रोची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ठाणे आणि त्यापुढील भागातील औद्योगिक पट्टा आणि वाढती लोकसंख्या पाहता, ठाण्याच्या पुढे मेट्रो नेण्याचा विचार करण्यात येत होता. या मेट्रोचा मार्ग ठाण्यातील कापूरबावडी ते कल्याणच्या शिवाजी चौकापर्यंत विचाराधीन असून सध्या 16 स्थानक या मार्गावर निश्चित करण्यात आली आहेत. ठाण्याच्या पुढे उपलब्ध असलेल्या वाहतूक पर्यायांच्या क्षमतेवर सध्या 15 हजार अतिरिक्त प्रवाशांचा ताण येत आहे. हा ताण कमी करण्यासाठी या मार्गावर नवीन मेट्रो मार्ग गरजेचा असल्याचे एमएमआरडीएने म्हटले आहे.
ठाणे आणि कल्याण ही मोठी स्थानके असून येथे पिक-अवर्सला प्रवाशांची मोठी गर्दी असते. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण पडतो. हा ताण कमी करण्यासाठी आता मेट्रोशिवाय पर्याय नसल्याचे मत एमएमआरडीएच्या अधिकार्यांचे आहे. मुंबईकडे ठाणे-कल्याणहून नोकरी/रोजगारानिमित्त येणार्यांची संख्या खूप मोठी आहे. तर भिवंडीत गोदाम, लूम फॅक्टरींची संख्या अधिक असल्यामुळे तिकडे कामगारांची ये-जा असते. त्यामुळे साहजिकच वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होतो. त्यामुळे ठाणे-भिवंडी- कल्याण मार्गासाठी मेट्रो रेल्वेचा विचार सुरु आहे.