Breaking News

कौमार्य चाचणी प्रकरण

मुलीची मुलाने मागितली माफी,
थाटणार पुन्हा एकत्र संसार

नाशिक, दि. 02 - नाशिकच्या संगमनेरमधील कौमार्य चाचणी प्रकरणाने उठलेले वादळ आता शांत झाले असून पीडित मुलीची मुलाने माफी मागितल्यानंतर वधू-वराने पुन्हा एकत्र नांदण्याचा निर्णय घेतल्यामुळे हे प्रकरण आता शांत झाले आहे. यावरून राज्यभरात चांगलेच वादळ उठले होते.
नवर्‍या मुलाने लग्नानंतर कौमार्य चाचणीत नापास झाल्यानंतर जातपंचायतीच्या आदेशानंतर अवघ्या 48 तासात तिच्याशी घटस्फोट घेतला, असे वृत्त होते. मात्र जातपंचायतीविरोधात आवाज उठवल्यानंतर दोन्ही बाजूंनी सामंजस्याची भूमिका घेत एकत्र नांदण्याचे ठरवले आहे. मात्र कौमार्य चाचणीसारखी समाजातील कुप्रथा मोडीत निघाली पाहिजे, असे मत दोघांनी व्यक्त केले आहे. लग्नानंतर पत्नीची कौमार्य चाचणी घेतल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये समोर आली होती. मात्र पत्नी त्यामध्ये नापास झाल्यामुळे नवर्‍याने लग्नानंतर अवघ्या 48 तासात तिला घटस्फोट दिला होता. 22 मे रोजी हा विवाह झाला होता.