Breaking News

नवीन विमानतळांना यापुढे व्यक्तींची नांवे नाहीत

नवी दिल्ली, दि. 02 - केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयाने देशात यापुढे उभारल्या जाणार्या विमानतळांना प्रसिद्ध व्यक्तींची नांवे न देण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. नवीन विमानतळ ज्या शहरांत असतील त्या शहरांची नांवेच विमानतळांना दिली जातील असा नवा नियम केला गेला आहे. राज्य सरकारांना एअरपोर्ट टर्मिनल व लाऊंजसाठी मात्र प्रसिद्ध व्यक्तींची नांवे देता येतील अर्थात त्यासाठी त्यांना केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी घ्यावी लागणार आहे.
भविष्यात प्रसिद्ध व्यक्तींची नांवे विमानतळांना न देण्याचा प्रस्ताव विमानवाहतूक मंत्रालयाने केंद्राकडे सादर केला आहे. चंदिगढ विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नांव द्यायचे की स्वातंत्र्यवीर मंगल पांडे यांचे द्यायचे यावरून पंजाब व हरियाना सरकारमध्ये सुरू असलेल्या वादानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. सध्याच्या नियमानुसार राज्य सरकारे कुणाचे नांव द्यायचे याचे विधेयक संमत करून तसा प्रस्ताव केंद्राकडे देतात व त्यावर केंद्रीय कबिनेट अंतिम निर्णय घेत असते.