दहशतवादबाधित पाच देशांच्या यादीत भारत
वाशिंग्टन, दि. 04 - जगभरात दहशतवाद प्रभावित पाच देशांच्या यादीत भारत आणि पाकिस्तानचा देखील समावेश आहे. मागील वर्षी या पाच देशात सर्वाधिक दहशतवादी कारवाया झाल्या असल्याची बाब अमेरिकेच्या मेरीलँड युनिव्हर्सिटीने केलेल्या सर्वेक्षणात समोर आली आहे. या सर्वेक्षणाची माहिती देताना अमेरिकेच्या दहशतवाद विरोधक कार्यक्रमाचे समन्वयक जस्टिन साइबेरेल यांनी सांगितले कि, जगभरात होणार्या दहशतवादी कारवायांमध्ये सर्वात जास्त म्हणजे 55 टक्के कारवाया या भारत, पाकिस्तान, इराक, अफगानिस्तान आणि नायजेरियामध्ये होतात.
दरम्यान 2015साली जगातील 92देशांमध्ये अशा प्रकारच्या कारवाया झाल्या आहे. या देशात मागील तीन वर्षात देखील अशा कारवाया घडत होत्या, पण 2014च्या तुलनेत 2015मध्ये सर्वात कमी कारवायांची नोंद झाली आहे. 2012पासून जगभरात दहशतवादी कारवाया आणि त्यात मारले गेलेल्या नागरिकांची संख्या कमी आहे, पण 2015मध्ये अफगानिस्तान, बांग्लादेश, इजिप्त, सीरिया आणि तुर्कस्तानमध्ये झालेल्या कारवायांमध्ये मारले गेलेल्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.
अमेरिका आणि त्यांच्या सहयोगी देशांना जगभरात सुरु असलेल्या दहशतवादाच्या मुद्द्यावर आव्हानांचा सामना करावा लागत आहे. इराक आणि सिरियामधील फौजा तेथील दहशतवाद्यांचा सामना करत आहेत. सध्याच्या घडीला इसिस ही दहशतवादी संघटना सर्वच देशांची डोकेदुखी ठरत असून त्यांनी इराक आणि सिरियातील बहुतेक भागांवर आपला कब्जा केला आहे.