ऑलिंपिक कमिटी मेंबरशीपसाठी नीता अंबानी नॉमिनेट
नवी दिल्ली, दि. 04 - इंटरनॅशनल आलिंपिक मेंबरशीपसाठी नीता अंबानी यांचे नांव सुचविले गेले आहे. त्यांची निवड झाली तर त्या जगातील सर्वात मोठ्या स्पोर्टस ऑरगनायझेशन समितीवर जाणार्या पहिल्या भारतीय महिला ठरणार आहेत.या संस्थेवर उन्हाळी, हिवाळी तसेच अपंग ऑलिंपिक स्पर्धा घेण्याची जबाबदारी आहे.
रिलायन्स फौंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष नीता अंबानी यांच्या नावाची शुक्रवारी शिफारस करण्यात आली. नवीन सदस्य म्हणून त्यांचे नांव सुचविले गेले असून 2 ते 4 ऑगस्ट या काळात रिओ येथे होत असलेल्या आयओसीच्या 129 व्या अधिवेशनात या संदर्भातला निकाल जाहीर होईल. नीता निवडल्या गेल्या तर वयाच्या 70 व्या वर्षापर्यंत त्या या समितीच्या सदस्य राहतील. या समितीवर निवड होणारे पहिले भारतीय होते दोराबजी टाटा.
नीता अंबानी या संदर्भात बोलताना म्हणाल्या, युवकांना प्रोत्साहन देणे, समाजातील एकजूट आणि विविध संस्कृती व पिढ्यांमधील दुवा म्हणून काम करण्यास त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले आहे. माझी निवड झाली तर भारतीय महिलांना एक वेगळी ओळख मिळू शकणार आहे.