Breaking News

एकनाथ खडसे अज्ञातवासात रवाना

मुंबई, दि. 04 - बीजेपीचे नेते व महाराष्ट्राचे महसूल मंत्री एकनाथ खडसे अज्ञात स्थळी रवाना झाले आहेत. शुक्रवारी त्यांनी कार्यकर्ते, प्रसारमाध्यमे अन्य नेत्यांपासून अलिप्त राहण्याचे धोरण स्वीकारले होते. त्यात त्यांचे दोन छोटे व्हीडीओ प्रसारित करण्यात आले आहेत. त्यात आपल्या विभागाची कांही महत्त्वाची कमे निपटायची असल्याने त्यांना डिस्टर्ब करू नये अशी विनंती केली गेली आहे.
या व्हिडीओनुसार मान्सून तोंडावर आला आहे, त्यामुळे शेतकर्यांच्या हिताच्या कांही योजनांना अंतिम स्वरूप दिले जात असल्याने गडबडीत असल्याचे खडसे सांगत आहेत. कामात व्यग्र असल्याने डिस्टर्ब करू नये असे सांगतानात खडसे ते मुख्यमंत्र्यांच्या सतत संपर्कात असल्याचेही सांगत आहेत. शेतकरी हिताचे प्रस्ताव आगामी कॅबिनेट बैठकीत मांडणार असल्याची ग्वाही खडसे यांनी दिली आहे. दरम्यान खडसे यांच्यावर होत असलेल्या गैरव्यवहार आरोप प्रकरणात सरकार व पक्ष त्यांच्या पाठीशी असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी जाहीर केले आहे.