अजिंक्यतारा कारखान्यामुळे कास तलावाच्या पाणीसाठ्यात वाढ होणार
सातारा, दि. 04 - सामाजिक बांधिलकी जोपासण्यात अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना नेहमीच एक पाऊल पुढे राहिला आहे. दुष्काळग्रस्तांसाठी सातत्याने मदतीचा हात पुढे करणार्या अजिंक्यतारा साखर कारखान्याने सातारा शहराचा वरदाता असलेल्या कास धरणातील गाळ काढण्यासाठीही पुढाकार घेवून सातारकरांचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी हातभार लावला आहे. या कार्याबद्दल सातारकर कारखान्याला धन्यवाद देत आहेत.
सातारा शहराला कास धरणातून सायफन पध्दतीने पाणीपुरवठा केला जातो. ब्रिटीश काळापासून शहराला पाणीपुरवठा करण्याचा प्रमुख स्त्रोत असलेल्या कास धरणातील पाणीसाठा दरवर्षी उन्हाळ्यात घटत असतो. यंदा मात्र भिषण दुष्काळामुळे पाणीपातळीत कमालीची घट झाली असून कधी नव्हे ते सातारकरांवर पाणी कपातीचे संकट ओढावले. पावसाने ओढ दिल्याने आणि धरणात वर्षानुवर्षे गाळ साचत राहिल्याने कास धरणाची पाणीपातळी खालावत चालली आहे. दरम्यान, पावसाळ्यापुर्वी कास धरणातील गाळ काढल्यास वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा होईल, या उद्देशाने अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सुचनेनुसार कारखान्यामार्फत कास धरणातील गाळ मोफत काढण्याचा निर्णय घेण्यात आला. सातारा नगरपरिषदेच्या सहमतीने कारखान्याच्या यांत्रिक विभागामार्फत कास धरणातील 1 हजार घनमीटर क्षेत्रातील गाळ काढण्यात येत आहे.
कारखान्याचा एक जेसीबी आणि पाच डंपर यांच्यासाह्याने गाळ काढण्याचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. पाच डंपरच्या साह्याने प्रतीदिन सुमारे 200 टन गाळ उचलला जात आहे. अजिंक्यतारा कारखान्याने मोफत गाळ उचलून कास धरणातील पाणीसाठा वाढीसाठी योगदान दिल्याबद्दल सातारा पालिकेच्या पदाधिकार्यांकडून कारखान्याचे आभार मानले जात आहेत. धरणातील गाळ काढण्याच्या कामाची पाहणी पालिकेच्या पाणीपुरवठा सभापती सौ. लिना गोरे, अभियंता सुधीर चव्हाण, कर्मचारी संदीप सावंत आदींनी केली. गाळ काढल्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होणार असून यामुळे आगामी काळात सातारकरांना पाणीटंचाईपासून दिलासा मिळेल, असा विश्वास पालिकेच्या पदाधिकार्यांनी व्यक्त केला आहे.