दुष्काळी कलंक पुसण्यासाठी आपापल्या गावांचा उध्दार करावा : ना. शिवतारे
सातारा, दि. 4 (प्रतिनिधी) : सर्वसामान्य जनता आपली मालक आहे. त्यांच्या अप्रत्यक्ष करातून आपण पगार घेतो. त्यासाठी प्रत्येक अधिकार्यांनी, कर्मचार्यांनी त्याचबरोबर लोकप्रतिनिधींनी उत्तरदायीत्व म्हणून आपापल्या गावांचा उध्दार करावा, असे आवाहन पालकमंत्री विजय शिवतारे यांनी केले.
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ पर्यावरण सप्ताहाच्या निमित्त माण-खटाव तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ, अधिकारी व कर्मचार्यांची संयुक्त पर्यावरण कार्यशाळा व वृक्ष लागवड पहाणी दौर्याचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते निढळ येथे करण्यात आले. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. या कार्यक्रमाला कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद यादव, रोहयोचे उपसचिव डॉ. प्रमोद शिंदे, विनोद वखारे, रोहयोचे उपजिल्हाधिकारी पराग सोमण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार सुरेखा माने, पंचायत समितीच्या सभापती अक्काताई म्हासाळ, गटविकास अधिकारी सीमा जगताप उपस्थित होत्या. प्रारंभी पालकमंत्री ना. शिवतारे यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले. त्यानंतर महात्मा गांधी आणि लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमांचे पूजन पालकमंत्री व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
ना. शिवतारे म्हणाले, महाराष्ट्र शासनाच्यावतीने लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ 3 ते 9 जून हा महत्वकांक्षी पर्यावरण सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र यावे. राज्यातील दुष्काळ हटविण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान सुरु केले आहे. अभिनेते सयाजी शिंदे माण, खटाव सारख्या दुष्काळी भागात येवून कामे करत आहेत. प्रभाकर देशमुख, चंद्रकांत दळवी हे अधिकारी आपली गावे जलयुक्त करत आहेत. यांचा आदर्श घेवून आपणही सहभागी झाल्यास निश्चित गावांचा विकास होईल.
कोकण विभागीय आयुक्त देशमुख म्हणाले, राज्याच्या जडणघडणीत स्व. गोपीनाथ मुंडे यांचे योगदान आहे. त्यांच्या स्मरणार्थ पर्यावरण सप्ताह राबविण्यात येत आहे. टंचाईग्रस्त भागातील अर्थव्यवस्था कोलमडते. अशी गावे जलयुक्त करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जलयुक्त शिवार अभियान सुरु केले आहे. या निमित्ताने विकेंद्रीत पाणीसाठे निर्माण करणे ते साठे पुन्हा भरणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. पुढच्या पिढीसाठी जलसाठ्यांमध्ये पाणी भरण्याचे काम आपणा सर्वांना करावयाचे आहे. गावा-गावामध्ये वडाची झाडे लावून या सप्ताहाच्या निमित्ताने कर्मवीर भाऊराव पाटील यांना आदरांजली वाहण्याचे त्यांनी आवाहन केले.
उपजिल्हाधिकारी पराग सोमण यांनी प्रास्ताविक करुन सविस्तर माहिती दिली. कार्यशाळेस माण, खटाव तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, ग्रामस्थ त्याचबरोबर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.