रस्त्याच्या कामाला लागली शनिची साडीसाती
। रस्त्याचे काम संस्थ गतीने । रोज होतात थोटे मोठे अपघात । ठेकेदाराचे व नगरसेवकांचे दुर्लक्ष
अहमदनगर, दि. 06 - गेल्या महिनाभरापासुन शहरातील लक्ष्मीबाई कारंजा ते शनिचौक आणि कोर्ट चौक ते संपदा चौक या ठिकाणी ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी रस्ता उखडला आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत असुन काम अतिषय संथ गतीने सुरु आहे. पावसाळा तोंडावर येवुन ठेवला असतानाही हे कामे अशी संथ सुरु असल्याने नागरीकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
यावरुन येथील थाटामाटात सुरु केलेले कामाला शनिची साडीसाथी लागली की काय असाच काहीसाप्रश्न पडत आहे. शनिचौकात रस्ता खोद्यल्याने लहान मुलांना क्लासला येणेे- जाणे अवघड झाले असुन शहरातील नागरीकांने रोज छोट्या मोठ्या अपघातांना तोंड द्यावे लागत असल्याचे चित्र आहे. परंतु याकडे ठेकेदार आणि नगरसेवकांचे लक्ष नसल्याचे प्रखरतेने जानवते आहे. गेल्या महिन्याभरापासून हा रस्ता खोदला होता. यावर ड्रेनेजचे काम झाले परंतु आता रस्ता करण्यासाठी निधी नाही कि आनखीन काही समस्या आहेत हे मात्र अद्यापही समजु शकले नाही. पावसाळा आता तोंडावर आला आहे. 15 जुनला विद्यार्थ्यांच्या शाळा सरु होत असुन यानंतर या रस्त्याची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. मात्र लोकप्रतिनिधी आणि ठेकेदार यांनी या कामाकडे पुर्णपणे दुर्लक्ष केले असल्याचे चित्र आहे.
शहरातील अनेक ठिकाणी पावसा अगोदर जी कामे पुर्ण व्हावी अशी अपेक्षा होती ती कामे तुर्त तरी झालेली दिसत नाही. तसेच दिल्लीगेटला भर टाकली यावरं राजकीय पक्षाने आंदोलन केले मात्र आजतागयत ही खड्डे आहे तसेच असल्याने राजकीय नेत्यांनी केलेले आंदोलन हे एक स्टंट होते की काय असाच काहीसा प्रश्न नगकरांना पडला आहे. शहरातील अनेक विकास कामे मार्गी लावण्यासाठी मनपाने आता पावले उचचली पाहिजे असे अनेकांचे मत आहे. तसेच शहरातील वर्दळीचा तसेच कोर्ट रोड वरील काम तातडीने मार्गी लावण्याची इच्छा अनेकांनी व्यक्त केली आहे. अन्यथा नागरीकांना आंदोलनाचा मार्ग स्विकारावले लागेल यात शंका नाही. नविन आयुक्तांकडु अनेक प्रश्न आहे मात्र ते हाताळतात कसे हाच एक महत्वाचा प्रश्न आहे.

