Breaking News

भाऊसाहेब फिरोदिया ः विज्ञान शाखेचा 100 टक्के निकाल


अहमदनगर, दि. 06 - भाऊसाहेब फिरोदिया हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी नुकतेच झालेल्या 12 वी बोर्डाच्या परिक्षेमध्ये उत्तम यश प्राप्त करुन, गुणवत्तेची उत्तम परंपरा कायम राखली आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शुक्रवार दि.03 जून रोजी संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नियामक मंडळाच्या सदस्या सुनंदा भालेराव, मुख्यध्यापक उल्हास दुगड, सुनिल खिस्ती, विलास औटी, राजेंद्र बेंद्रे आदिसह विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक उपस्थित होते.
विद्यालयाच्या 12 वी विज्ञान शाखेचा 100 टक्के तर वाणिज्य शाखेचा 97.27 टक्के निकाल लागला आहे. विज्ञान शाखेच्या 7 विद्यार्थ्यांनी गुणवत्तेच्या आधारावर शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे. सेजल वर्मा व अपूर्वा देवळालीकर या विद्यार्थिनींनी अकाऊंट या विषयात 100 पैकी 100 गुण प्राप्त केले आहे.
शास्त्र शाखेत विद्यालयात पहिली- ऐश्‍वर्या आंधळे (88.46 टक्के गुण), दुसरी- गीता गुंदेचा (87.38 टक्के गुण), तिसरा- अमित रासकर (85.08 टक्के गुण), चौथी- अक्षय चांडोले (84.92 टक्के गुण), हर्षदीप शेलार (88.00 टक्के गुण) गुण प्राप्त करुन उत्तीर्ण झाले आहे. तर वाणिज्य शाखेत विद्यालयात पहिली- पूर्वा कटारिया (90.15 टक्के गुण), दुसरी- सेजल वर्मा (88.76 टक्के गुण), तीसरा- विनय आहुजा (88.30 टक्के गुण), चौथी- मानसी बोरा (88.15 टक्के गुण), पाचवी- अपूर्वा देवळालीकर (87.77 टक्के गुण), आकांक्षा चुत्तर (88.46 टक्के गुण) गुण प्राप्त करुन शाळेच्या गुणवत्ता यादीत आले आहे.