Breaking News

कारकुन जोशी विरूध्द कर्मचारी रस्त्यावर येण्याचे ‘संकेत’

महिला कर्मचार्‍यांशी उध्दट वर्तन; ठेकेदारांचाही लाचेसाठी अवमान

मुंबई, विशेष/प्रतिनिधी दि. 07 - भ्रष्टाचाराच्या हिरव्या कुरणात चरून वाढलेल्या चरबीने मुजोर बनलेल्या अभियंता कर्मचार्‍यांचे गुण लिपीक पदापर्यंत झिरपले  सून या मुजोरीचे बळी ठरलेले कर्मचारी विशेषतः महिला कर्मचारी अशाच जोशी नामक लिपीकाविरूध्द आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे ‘संकेत’ आहेत.
साबां म्हटले की, भ्रष्टाचाराचे हिरवे कुरण असा समज काही अभियंते आणि त्यांच्या गोटातील टेंडरक्लर्क आणि लिपिकांचा झाला आहे. भ्रष्टाचाराच्या कमाईतून  मुजोर झालेली ही मंडळी आपल्याच विभागातील प्रामाणिकपणे काम करणार्‍या अभियंत्यांसह कर्मचार्‍यांना छळतात, असाच प्रकार मुंबई साबांमंडळाच्या अधिक्षक  अभियंता कार्यालयात सुरू आहे. जमीन मालकाची पण बांधावर राखणदार म्हणून ठेवलेल्या गड्याची दादागिरी अनेकदा पहायला मिळते मुंबई साबां मंडळ अधिक्षक  अभियंत्यांचे कार्यालयातही हेच चित्र पहायला मिळत असून या कार्यालयातही लिपिक संकेत जोशी यांची दादागिरी कर्मचारी विशेषतः महिला वर्गास जाणूनबुजून  छळत असल्याची तक्रार लोकमंथनकडे प्राप्त झाली आहे. सर्व कर्मचारी मुर्ख आहेत. परमेश्‍वराने सारी अक्कल संकेत जोशी यांच्याच झोळीत टाकली या अविर्भावात  हे महाशय वावरत असल्याचे या कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे.
या माणसाची काम करण्याची पध्दत विचित्र अन अशोभनिय असून केवळ कर्मचारीच नाही तर ठेकेदारही या वर्तनाला कंटाळले आहेत. ठेकेदारांकडून आर्थिक  फायदा लाटण्याच्या हेतूने त्यांना अवमानकारक वागणूक देतांनाच सहकारी कर्मचारी विशेषतः महिला कर्मचार्‍यांशीही उधंदटपणे वागणार्‍या या संकेत जोशीवर  वरिष्ठांनी योग्य ती कारवाई करावी अन्यथा आपल्याच कार्यालयातील या मुजोरी विरूध्द रस्त्यावर उतरून आंदोलन छेडावे लागेल असे कर्मचार्‍यांनी लोकमंथनकडे  दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.संकेत जोशी हे ठाणे साबां कार्यालयात कार्यरत असतांना अशाच प्रकारचत्या वर्तनामुळे तिथून अक्षरशः हाकलण्यात आले. सचिव  पातळीवरील वरिष्ठ अधिकार्‍यांची नावे घेऊन सहकारी कर्मचार्‍यांवर प्रभाव टाकून धमकाविणारे संकेत जोशी यांचा अवगुण मुंबई साबांमंडळांतही भ्रष्टाचार शिष्टाचार  बनविण्यास कारणीभूत ठरल्याने सहकारी कर्मचार्‍यांसह साबां मंडळ कार्यालयाची बदनामी होत असल्याचा आरोप सहकर्मचार्‍यांनी केला आहे.