Breaking News

पाऊलबुद्धे शाळेच्या यशात विद्यार्थ्यांचा मोलाचा वाटा- देवदत्त पाऊलबुद्धे

अहमदनगर, दि.18 -  सेवा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉ.ना.ज.पाऊलबुद्धे माध्यमिक विद्यालयाच्या एस.एस.सी. व एच. एस.सी.चा निकाल चांगला लागला यामध्ये शिक्षकांचे, पालकांचे मोठे योगदान होते. त्याच बरोबर या यशात विद्यार्थ्यांचा मोलाचा वाटा आहे. असे प्रतिपादन संस्थेचे देवदत्त पाऊलबुद्धे यांनी केले.
मार्च 2016 मध्ये एस.एस.सीचा 89.89 टक्के निकाल लागला. यामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमात पाऊलबुद्धे पॉलिटेक्नीक कॉलेज चे प्राचार्य बी.डी.बोर्डे, बी एड.च्या प्राचार्या डॉ.रेखाराणी खुराना, डी.फार्मसीच्या प्राचार्या ए.के.चव्हाण, माध्यमिकच्या प्राचार्या के.वाय.लंवादे आदि उपस्थित होते.
पाऊलबुद्धे पुढे म्हणाले गोर गरीब विडी कामगार सर्वसामान्य लोकांसाठी मुला मुलींना शिक्षण घेता यावे  या उद्देशाने कै.डॉ.ना.ज.पाऊलबुद्धे यांनी हि संस्था उभारुन शाळा सुरु केली. या शाळेतून अनेक विद्यार्थी घडले ते त्याच्या स्वत:च्या कर्तृत्वावर पण शाळेतील शिक्षक, पालक यांचे मोठे योगदान आहे. संस्था नावारुपाला येण्यास शिक्षकांबरेाबरच विद्यार्थ्यांचा मोलाचा वाटा आहे. असे ते म्हणाले,  यावेळी शाळेत प्रथम येणारी विद्यार्थींनी तेजश्री टापरे (95.60) गुण, द्वितीय हषवर्धन बोर्डे (93.80) गुण तर तृतीय प्रियंका शिरसाठ (91.20) गुण यांचा संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला. उत्तेजनार्थ ओंकार कोंडा (90.80) गुण मिळाविलेल्या विद्यार्थ्यांला सन्मानित करण्यात आला. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. संस्थेचे पाठबळ, शिक्षकांचे मोठे योगदान, आणि आई-वडीलांच्या योग्य मार्गदर्शनामुळे यश मिळविल्याचे  सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्तविक बी.एम.बिडवे यांनी केले. तर आभार आर.के.मोरे यांनी मानले.