स्वच्छता राहण्यासाठी प्रत्येकाने स्वतः कृती करणे आवश्यक
अहमदनगर, दि. 04 - प्रत्येकजण स्वच्छता होणे गरजेचे आहे, असे बोलतो. मात्र, कृती करताना तो ही गोष्ट विसरून जातो. प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात केल्यास सगळीकडे स्वच्छता होण्यास वेळ लागणार नाही. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून स्वच्छता मोहीम राबविली जात आहे, ही चांगली गोष्ट आहे. यामध्ये लोकसहभाग वाढवला पाहिजे. माझ्या प्रभागात राबविण्यात आली. त्यावेळी नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले हो
ते. स्वच्छता मोहीमेत सातत्य राहिले पाहिजे. प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरापुढील परिसर व थोडासा आसपासचा परिसर स्वच्छ ठेवण्यास सुरुवात केल्यास चित्र बदलण्यास वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन मनपा स्थायी समितीचे सभापती तथा प्रभाग 30चे नगरसेवक गणेश भोसले यांनी केले.
प्रभाग 30मधील मोमीनवाडा येथील महिलांना स्वच्छता राहण्याच्या उद्देशाने श्री. भोेसले यांच्या हस्ते डस्बिनचे वाटप करण्यात आले. यावेळी श्री. भोसले बोलत होते. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. भोसले पुढे म्हणाले की, प्रभागामध्ये विकासकामे करताना भेदभाव करीत नाही. आपण केलेल्या विकासकामातून नागरिकांच्या चेहर्यावर जो आनंद दिसतो, त्यातून मला समाधान मिळते. आपण आज मोमीनवाडा परिसरात डस्बिनचे वाटप करण्यात आले आहे. महिलांनी त्याचा सदुपयोग करावा. प्रत्येकाला स्वच्छतेची सवय एकदम लागणार नाही, ती हळूहळू अंगवळणी पडेल. मात्र, त्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. टप्प्याटप्प्याने प्रभागातील सर्व परिसरातील कुटुंबांना डस्बिनचे वाटप करण्याचा मानस आहे, असे ते म्हणाले.