Breaking News

भाजपकडून उपमहापौरपदासाठी रस्सीखेच

। भाजपची गटबाजी उफाळुन येण्याची शक्यता  । महापौर सेनेचा उमेदवार तर उपमहापौर कोणाचा ?

अहमदनगर, दि. 04 - महापौर अभिषेक कळमकर व उपमहापौर सुवर्णा कोतकर यांच्यापदाची मुदत जून अखेरीस संपत आहे. महापौरपदाची निवड पुढील अडीच वर्षाचे आरक्षण सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. यावरुन आता रणकंद चांगलेच पेटले असून महापौरदासाठी शिवसेच्या उमेदवाराची निवड होणार असली तरी भाजपच्या गटात मात्र, अद्यापही अस्वस्थता असुन उपमहापौरपदासाठी उमेदवार कोण याची चर्चा शहरात सुरु आहे. यावरुन भाजपच्या गटातील गटाबी पुन्हा उफाळुन येण्याची शक्यता आहे.

उपमहापौरपद भाजपाला मिळणार असल्याने, या पक्षाच्या नगरसेवकांनीही त्यादृष्टीने जय्यत तयारी केली असल्याची माहीती मिळाली आहे. खा. दिलीप गांधी यांचे चिरंजीव सुवेंद्र गांधी यांचे नाव या पदासाठी चर्चेत होते. परंतु या नावाला विरोध होण्याची शक्यताही अनेकांनी दर्शवली आहे.
एका बैठकीत बाबासाहेब वाकळे, सुवेंद्र गांधी, महेश तवले, उषा नलावडे, मालन ढोणे, मनिषा बारस्कर, नंदा साठे , श्रीपाद छिंदम उपस्थित होते. बैठकीत गटनेते कावरे यांच्यासह सर्व 9 नगरसेवकांनी आपण उपमहापौर पदासाठी इच्छुक असल्याचे सांगितले. मात्र, पक्षश्रेष्ठी ज्यांचे नाव निश्‍चित करतील त्यांच्या पाठीमागे उभे राहण्याची ग्वाहीही इतर नगरसेवकांनी दिली आहे.  सध्याच्या वातावरणावरुन तरी उपमहापौरपदासाठी मालनताई ढोणे, मनिषा बारस्कर यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. शहरात सध्या महापौर व उपमहापौर निवडीचे  वातावरण असले तरी भाजपच्या काही नगरसेवकांनी लेखी पत्राव्दारे काही सुचना केल्या असल्याची माहीती विश्‍वासनीय सुत्राकडुन समजली आहे. या निवडणुकीत महापौर जरी शिवसेनच्या वरिष्ठ पातळवरुन निश्‍चित केला जाणार असला तरी उपमहापौपदासाठीही आता पालकमंत्री प्रा.राम शिंदे आणि जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड यांना पुढाकार घ्यावा यासाठी काही नगरसेवकांनी वरिष्ठान विनंती केली आहे.
एकाच घरात किती पदे द्यायचे असाच काहीसा सुर भाजप नेत्यांमध्ये ऐकावयास मिळत आहे.