Breaking News

भारत विद्यालयात गुणवंतांचा कौतुक सोहळा

बुलडाणा, दि. 05 - दरवर्षी प्रमाणे यंदाही भारत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली .यंदा भारत उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल 97.99 लागला. विज्ञान शाखेतुन 93.38% गुण मिळवुन अमन बाबला प्रथम, 93.04% गुण मिळवुन गिरीबाला सोनुने व्दितीय,तर नितीकेश जाधव हा 89.84 गुण मिळवुन विद्यालयातुन अनुक्रमे तीसरा आला.कला शाखेतुन सतीश जाधव 88.15% गुण मिळवुन प्रथम, कु स्वाती हिवाळे, 547 गुण मिळवुन द्वितीय तर कृतीका गायकवाड 544 गुण मिळवुन  विद्यालयातुन तिसरी आली.या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन आगाशे,संस्थेच्या संचालीका डॉ सिमा आगाशे, मुख्याध्यापक एस आर उन्हाळे यांनी सत्कार केला. यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमाचे संचलन राजेश लाड यांनी केले.याप्रसंगी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,पालक,विद्यार्थी उपस्थीत होते.