दे.माळी येथे अहिल्याबाई होळकर जयंती उत्साहात
बुलडाणा, दि. 05 - स्थानिक मल्हारसेनेच्या वतीने राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांची 251 वी जयंती मोठ्या उत्साहात गावातील सर्व 12 बलुतेदार यांना सोबत घेवून साजरी करण्यात आली. सुरुवातील सकाळी 7 वाजता भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. मार्गातील महात्मा फुले, डॉ.बी.आर.आंबेडकर, महात्मा गांधी यांच्या पुतळ्यांना आशाताई झोरे महिला व बालकल्याण सभापती जि.प.बुलडाणा, एम.व्ही.गाभणे, संजय जाधव, सागर वानखेडे, अनिल चाळगे, भास्कर गवई यांनी पुष्पहार अर्पण केले. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर अंगणवाडी क्र.6 येथे मुलांना खावू वाटप करुन प्रतिमा सप्रेम भेट देण्यात आली. यावेळी अंगणवा
डी सेविका सिंधु लोणकर, यशोदा इंगोले, सत्यभामा बळी व सर्व मदतनिस उपस्थित होत्या. सायंकाळी ढोलताशांच्या गजरात भव्य रथामध्ये मिरवणुक काढण्यात आली. त्यानंतर पांडूरंग संस्थानासमोरील खुल्या मैदानात सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी गजेंद्र गवई यांनी आपल्या भाषणातून अहिल्यादेवींच्या जीवनावर प्रकाश टाकला.
यावेळी मल्हार सेनेेचे अध्यक्ष अर्जुन चाळगे, पत्रकार कैलास राऊत, उपसरपंच विनोद फलके, समाधान मगर, पोलीस पाटील, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गजानन चाळगे, नारायण चाळगे, शिवशंकर मगर, गणेश चाळगे, ॠषीकेश चाळगे, दीपक शेळके, नंदकिशोर फलके, मोहन पोकळे, प्रताप चाळगे, गणेश शेळके, मोहन खोडवे, बद्री चाळगे, विजू शेळके, ज्ञानेश्वर चाळगे, इत्यादींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिवशंकर मगर यांनी केले तर आभार प्रदर्शन कैलास राऊत यांनी मानले. कार्यक्रमास धनगर समाज बांधव व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.