जीएसटीला मोदींनीच विरोध केला होता : स्वामी
मुंबई, दि. 18 - वस्तू व सेवा कर म्हणजे जीएसटी विधेयक अप्रत्यक्ष करातील सर्वात मोठी सुधारणा म्हणून सरकारतर्फे सांगण्यात येत असले तरीही त्याचा अर्थव्यवस्थेला फारसा फायदा होणार नाही, असे मत भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी व्यक्त केले आहे. स्वामी यांनी सरकारचा दावा खोटा आहे, असेच त्यातून अप्रत्यक्षपणे सूचित केले आहे.
स्वामी म्हणाले की, जीएसटी हे खेळाचे नियम बदलून टाकणारे वगैरे काही नाही. ते विधेयक आले तरी ठीक आहे आणि आले नाही तरी काहीही बिघडणार नाही. इंडियन र्मचट चेंबरमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते.
जीएसटी भारतीय अर्थव्यवस्थेसाठी फार मोठे विधेयक असे काही नाही. फक्त त्यामुळे करव्यवस्थेत सुटसुटीतपणा येईल, अशी भावना आहे. त्याला माझी हरकत नाही, असे स्वामी यांनी सांगितले.
दोन्ही सरकारांच्या कार्यकाळात अडकून पडलेले जीएसटी विधेयक मंजूर झाले तरीही भारताचे सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) 2 टक्क्यांनी वाढेल, असे उद्योगजगाचे मत आहे. त्यावर स्वामी यांनी पाणी फेरले आहे.
खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यानीच गुजरातचे मुख्यमंत्री असताना या विधेयकाला विरोध केला होता, याची आठवण स्वामी यांनी करून दिली आहे. आता तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता विरोध करत आहेत. मोदींनी नुसता विरोध केला नाही तर तत्कालीन सरकारला पत्रही लिहिले होते, असे स्वामी म्हणाले. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यानी काही दिवसांपूर्वीच बहुतेक सर्व राज्यांनी जीएसटीला समर्थन दिले.