जीन्स-टीशर्ट घातल्याने डोके फिरते : जिल्हाधिकारी
लखनऊ, दि. 18 - उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एन. के. एस. चौहान यांनी सरकारी कर्मचार्यांना जीन्स आणि टीशर्ट घालण्यास मनाई करत, जीन्स-टीशर्ट घातल्याने डोके फिरते असा अजब तर्क लावला आहे. चौहान यांनी याबाबतचे प्रसिद्धीपत्रक काढत जिल्ह्यातील सरकारी कर्मचार्यांना जीन्स-टीशर्ट घालण्यास सक्त मनाई केली आहे. या नियमाचे उल्लंघन करणार्यांना 500 रुपये दंडही आकारण्यात येणार आहे. या पत्रकात लिहिले आहे, की सर्व कर्मचार्यांनी कार्यालयात येणार्या साध्या वेशातच यावे. जीन्स-टीशर्ट घालण्यावर बंदी आहे. तसेच कोणताही कर्मचारी धुम्रपान करताना आढळल्यास त्यालाही दंड करण्यात येणार आहे.
