आप हिरो, मोदी झिरो : केजरीवाल
नवी दिल्ली, दि. 18 - आम आदमी पक्षाला दिल्लीत सत्तेवर येऊन दीड वर्ष झाल्याच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. मोदी सरकारला 2 वर्ष तर आप सरकारला दीड वर्ष पूर्ण झाली, तरी जनतेच्या नजरेत ’मोदी झिरो आप हिरो’ आहे’ असे ट्विट करत केजरीवाल यांनी मोदींवर निशाणा साधला. तसेच प्रदर्शनापूर्वीच सेन्सॉर बोर्डाशी झालेल्या वादामुळे चर्चेत आलेल्या ‘उडता पंजाब’ चित्रपटाबाबतही केजरीवाल यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया व्यक्त करत पंजाब सरकारवर टीका केली आहे.
