आशिष खेतानच्या तालावर सीबीआय करते काम : अभय वर्तक
मुंबई, दि. 02 - सीबीआयच्या कारवाईपूर्वीच आशिष खेतान ट्वीट करतात आणि मग कारवाई होते, हे पूर्वनियोजित षड्यंत्र असून सीबीआय आशिष खेतानच्या तालावर काम करते, असा आरोप सनातनचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी केला आहे.
यावेळी, संजीव पुनाळेकर म्हणाले, आशिष खेतान यांना धडा शिकवू. मात्र, पत्रकारांनी त्यावर पुन्हा प्रश्न केल्यानंतर संजीव पुनाळेकरांनी याबाबत सारवासारव करत, सनदशीर मार्गाने आशिष खेतान यांना धडा शिकवू असे म्हटले आहे.
सीबीआयने डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी अनेकदा सनातनच्या आश्रमात चौकशीसाठी येऊन गेली. सीबीआयची टीम नियमित चौकशीसीठी आश्रमात आली होती. मात्र, आशिष खेतानने सीबीआयची टीम चौकशीसाठी येण्याआधी ट्वीट केला. सीबीआय टीम येण्याआधी खेतान ट्वीट करतात म्हणजे, हे पूर्वनियोजित षड्यंत्र आहे, असे अभय वर्तक म्हणाले.
सनातनला बदनाम करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न सीबीआय करत असल्याचा आरोप सनातनचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी केला आहे. शिवाय, सीबीआय अधिकारी नंदकुमार नायर यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणीही सनातनने गृहमंत्र्यांकडे केली आहे. सनातनचे साधक सारंग अकोलकर यांच्या घरी सीबीआयने विनापरवानगी जाऊन घरात तोडफोड केली. याविरोधात अकोलकर यांच्या कुटुंबाने पोलीस तक्रार केली आहे, अशी माहितीही वर्तक यांनी दिली.
मडगाव स्फोटाचा आरोपी सारंग अकोलकर आणि रुद्र गौडा-पाटील आमच्या संपर्कात असून आम्हाला सरकारवर विश्वास नसल्याने ते आतापर्यंत समोर आले नाही. शिवाय, आम्हीही त्यांना समोर न येण्याचा सल्ला दिला असल्याचे सनातनचे संजीव पुनाळेकर म्हणाले.