प्रियांका वद्रांच्या बंगल्याची परवानगी रद्द करा
शिमला, दि. 18 - शिमल्याजवळील छाराब्रा येथे गेल्या सहा वर्षांपासून प्रियांका गांधी-वद्रा यांच्या सुरु असलेल्या बंगल्याची परवानगी रद्द करण्याची मागणी, भाजपचे शिमल्यातील आमदार सुरेश भारद्वाज यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. प्रियांका गांधी यांच्या बंगल्याचे सुरु असलेले बांधकाम अति संवेदनशील परिसरात सुरु असल्याने या बंगल्याची परवानगी रद्द करण्याची मागणी भारद्वाज यांच्याकडून करण्यात आली आहे. भारद्वाज यांनी या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांना पत्र लिहिले आहे.
