Breaking News

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त सामूहिक शपथ

अहमदनगर, दि. 04 - जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त लार्सन अँण्ड टुब्रो कंपनीत प्रसिद्ध व्याख्याते शिवाजी नाईकवाडी यांच्या व्याख्यानाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी कंपनीचे डेप्युटी मॅनेजर महेश चांडक, युनियनचे अध्यक्ष किरण देशमुख, डेप्यु. मॅनेजर,अविनाश मांडे, मानव संसाधन विभागप्रमुख नागेश्‍चंद्र आढाव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मानव संसाधन विभागाचे प्रमुख आढाव यांनी प्रास्ताविक करून या कार्यक्रमामागील हेतू विषद केला. 
 तंबाखूच्या व्यसनामुळे भारतात दरवर्षी सुमारे 50 लाख लोकांचा मृत्यू होतो.अनेकांना बाल वयातही हे व्यसन जडलेले आहे. तंबाखूचे व्यसन युवा पिढीमध्ये अतिशय जोमाने वाढत असून, त्यांच्या विषयीचे असलेले तोटे जनतेपर्यंत पोहचवावेत. तंबाखू खाण्यापासून त्यांना परावृत्त करावे. अशा उद्देशाने जनजागृती करण्यासाठी कंपनीत या कार्यकमाचे आयोजन केल्याचे आढाव यांनी सांगितले. शिवाजी नाईकवाडी म्हणाले तसं व्यसन हा संस्कृत शब्द आहे. विभाजन, नाश अशा अर्थाचा हा शब्द असून. व्यसन हे मनाची शुद्धता घालविते. स्वत:चे भान विसरून मनुष्यास परावलंबी करण्याचे काम हे फक्त व्यसनाकडून होते. आयुष्यात जर आपणास यशस्वीतेकडे वाटचाल करावयाची असेल, तर ही व्यसने टाळून स्वत:चा आत्मविश्‍वास वाढवा, सकारात्मक दृष्टीकोनातून समाजाकडे पहा. असे सांगून उपस्थित कर्मचारी व अधिकार्यांना तंबाखू विरोधी जनजागृती व्हावी व समाजप्रबोधन व्हावे, यासाठी शपथ दिली. कार्यकमाच्या शेवटी ईश्‍वर हांडे यांनी आभार मानले.