Breaking News

पवित्र रमजानला मंगळवारपासून प्रारंभ

अहमदनगर। प्रतिनिधी । 08 - मुस्लीम दिनदर्शिकेप्रमाणे रमजान या पवित्र महिन्याला मंगळवार (दि.7) पासून प्रारंभ  झाला आहे. दुष्काळाने त्रस्त झालेल्या नागरिकांना पावसाने दिलासा मिळाला असून मुस्लीम बांधवांमध्येही चैतन्य संचारले आहे. मंगळवारी पहिला रोजा असल्याने फळ आणि खाद्यपदार्थ तयार करणार्‍या दुकानांमध्ये लगबग सुरू होती.
वाईट प्रवृत्तीला कैद केले जाते. सदाचारी आणि प्रामाणिकतेला या महिन्यापासून सुरवात होते. या महिन्यात रोजा (उपवास) करणार्यांना पुण्य मिळते,अशी भावना मुस्लीम समुदायामध्ये असल्याने रमजान या महिन्याला पवित्र मानले जाते. मानवतेचा धर्म पाळण्याची शिकवण या महिन्यामुळे होते. त्यामुळे मुस्लीम बांधव या महिन्याची आतुरतेने वाट पाहतात. सोमवारी चंद्रदर्शन झाल्यानंतरच मंगळवारपासून रोजाचे उपवास सुरू करता येणार आहेत. नगर शहरात ढगाळ वातावरणामुळे सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत चंद्रदर्शन झाले नव्हते. इतर राज्यात चंद्रदर्शन झाले का, याची चौकशी करण्यासाठी मुस्लीम बांधवांची लगबग सुरू होती.