Breaking News

काँग्रेसच्यावतीने केंद्र सरकारचा निषेध

अहमदनगर, दि. 01 - भाजप सरकारला सत्तेत येऊन दोन वर्षे झाली असता अहमदनगर शहर जिल्हा कमिटीच्या वतीने अच्छे  व सच्चे दिनाची दुसरी पुण्यातिथी साजरी करुन सर्वसामान्य जतनेच्या वतीने केंद्र सरकारच्या निषेध काँग्रसच्या वतीने आज करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अच्छे दिनचे आश्‍वासन दिले होते. परंतु त्यांचे अच्छे दिन अजुन कोणालाच दिसले नाहीत. उलटपक्षी देशातील यापूर्वीचे अच्छे व सच्छे दिन संपुष्टात आले आहेत. या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
यावेळी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, गौरव ढोणे, आर.आर.पिल्ले, शाम वाघस्कर, रिजवान शेख, दानिश शेख, फैय्याज शेख, बाळासाहेब भंडारी, सुमित बनसोडे, नलिनी गायकवाड, जाहिरा शेख, सुनिता बागडे आदी उपस्थित होते.
काँग्रसेन दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला दि.26 मे रोजी सत्तेत येऊन दोन वर्षे पुर्ण झाली. लोकसभा निवडणूकीच्या काळात भारतीय जनता पक्षाने अनेक आश्‍वासने दिली होती. त्यातील प्रमुख आश्‍वासने अजुनही पुर्ण झालेली नाहीत. सत्तेत आल्यावर 100 दिवसात विदेशातील काळा पैसा परत आणून प्रत्येक नागरीकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याची घोषणा करण्यात आली होती. शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या 50 टक्के नफा मिळेल इतका भाव देण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. महागाई कमी करुन जीवनावश्यक वस्तुंच्या किंमतीत नियंत्रणात ठेवण्यात येतील असेही आश्‍वासन देण्यात आले होते. परंतु मागील दोन वर्षात यातील एकही आश्‍वासन पूर्ण झालेले नाही किंवा ती आश्‍वासने पूर्ण करण्याच्या दृष्टीने विश्‍वासआहर्ता पाऊलं पडताना दिसत नाहीत. उलपक्षी या सरकारच्या कार्यकाळात एपीएलला स्वस्त धान्य देण्याकरिता सरकारकडून दिले जाणारे अंशदान बंद करण्यात आले. इंदिरा आवासा योजना बंद करण्यात आली, महिला, दलित, अपंग, अल्पसंख्याक अशज्ञा विविध घटकांसाठी असलेल्या योजनांध्ये कपात करण्यात आली आहे.