सहकारी संस्थेवर शेतकरी विकास मंडळाचे वर्चस्व
शेवगांव, दि. 01 - संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेल्या मल्लिकार्जुनेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या (घोटण) निवडणुकीत मल्लिकार्जुनेश्वर शेतकरी विकास मंडळाने सर्व 13 जागेवर मोठया मताधिक्याने विजय मिळवत विरोधी मल्लिकार्जुनेश्वर ग्रामविकास मंडळाचा दारुण पराभव केला.
या घोटण संस्थेची स्थापना स्वातंत्र्य पूर्व काळात 1913 मध्ये झालेली आहे. या संस्थेची वार्षीक उलाढाल सुमारे 20 कोटी रुपये आहे. तालुक्यातील उत्पन्नाच्या बाबतीत सर्वात मोठी आर्थिक उलाढाल असलेली संस्था असून संस्थेचे 1601 सभासद आहेत. 13 जागांसाठी रविवार (ता.29) रोजी 1323 (82 टक्के) मतदान झाले होते. मतमोजनी सोमवारी शेवगाव येथे उशीरापर्यंत सुरु होती. या सोसायटीच्या निवडणूकीकडे राजकीय क्षेत्रातील संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. मल्लिकार्जुनेश्वर शेतकरी विकास मंडळाचे नेतृत्व माजी चेअरमन लक्ष्मण टाकळकर, माजी चेअरमन संजय मोटकर, नाना पाटील मोटकर, माजी सरपंच संजय टाकळकर, केदारेश्वरचे माजी संचालक मधुकर गोरे, नामदेव घुगे यांनी केले. तर विरोधी मल्लिकार्जुनेश्वर ग्रामविकास मंडळाचे नेतृत्व माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक मोटकर, केदारेश्वरचे विदयमान संचालक रणजीत घुगे, विदयमान सरपंच अरुण घाडगे, माजी सरपंच कुंडलीक घुगे, केदारेश्वरचे माजी संचालक मदन मोटकर, दुध संस्थेचे अध्यक्ष सर्जेराव ढाकणे यांनी केले. संस्थेवर वर्चस्व मिळवण्यासाठी दोन्ही मंडळाच्या वतीने प्रचाराची मोठी राळ उठवण्यात आली. यामुळे निकालाबबातची उत्सुकता वाढली होती. मात्र, विदयमान सत्ताधा-यांनी सुरुवाती पासुनच मोठी आघाडी घेत विरोधकांचे मोठया फरकाने पानिपत केले. निकालानंतर फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष साजरा केला.
उमेदवारांची नावे व त्यांना पडलेली मते : सर्व साधारण गट - बबन बाबुराव खेडकर (867 विजयी), आव्हाड नितीन शेषेराव (390 पराभुत), मधुकर सोनाजी गोरे (838 विजयी), घुगे रणजीत पांडुरंग (406 पराभुत), घनवट मारुती धोंडीराम ( 834 विजयी ), घुगे विष्णु ज्ञानदेव (435 पराभुत), लक्ष्मण गंगाराम टाकळकर (882 विजयी), नानासाहेब कडुबा जगताप ( 383 पराभुत), कारबारी त्रिंबक थोरात ( 840 विजयी), तुकाराम नामदेव थोरवे (448 पराभुत), विठ्ठल निवृत्ती मोटकर ( 885 विजयी), आसाराम महादु मिसाळ (399 पराभुत), संजय मधुकर क्षिरसागर (844 विजयी), सोन्याबापु बबन शेळके (403 पराभुत), पिरमहम्मद याकुब शेख (776 विजयी).
अनु.जाती.जमाती - दादासाहेब साहेबराव ज्योतीक (935 विजयी), रामकिसन बंडु गंगावणे (357 पराभुत).
महिला राखीव - कांताबाई दामोधर घुगे (888 विजयी), कमल राजेंद्र घुगे (393 पराभुत), संगिता सुखदेव डेंगळे, (877 विजयी), द्रैापदाबाई सुनिल थोरवे (401 पराभुत). इतर मागासवर्गीय - संजय बबनराव मोटकर (896 विजयी), रमेश अंबादास विघ्ने (394 पराभुत). भटके विमुक्त - मुरलीधर त्रिंबक थोरवे (849 विजयी ), तुकाराम नामदेव थोरवे (439 पराभुत)
निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन एस.ई.आदमाने यांनी कम पाहिले. त्यांना संस्थेचे सचिव बी.एस. लंभाटे यांनी सहकार्य केले.