ताडीत हानीकारक केमीकल मिसळल्याने नागरिकांचे जीवन धोक्यात
। छावा संघटनेचे राज्य उत्पादन शुल्क अधिकार्यांना निवेदन
अहमदनगर, दि. 01 - जिल्हयात विक्री केल्या जाणार्या ताडीत हाणीकारक केमीकल्स मिसळले जात असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होत आहेत. यातुन ताडीविक्रेते नागरीकांच्या जिवाशी खेळत असल्याचा आरोप अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.याबाबत छावा संघटनेच्या वतीने राज्य उत्पादक शुल्क अधीक्षक यांना निवेदन सादर करण्यात आले यावेळी राज्य उत्पादन शुल्कच्या अधिक्षक भाग्यश्री जाधव - खेतमाळीस यांच्या बरोबर चर्चा करण्यात आली. यावेळी छावा संघटनेच्या महिला जिल्हाध्यखा सुरेखा शिवाजीराजे सांगळे , शहराध्यक्ष दत्ता मावन, अजय राऊत, निलीमा यनगुपटला, सोमनाथ मारवाडे, शंकर अळोळे, महादेव दारकुंडे, अशोक अठरे, प्रविण धनवळे, श्रीपाद वाघमारे, दिपक शेळके आदिसह छावा संघटनेचे विविध विभागातील कार्यकर्ते उपस्थित होते.
छावा संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, नगर शहरासह जिल्ह्यात ताडीची विक्री होत आहे. ताडीत क्लोअर हायड्रेट हे विषारी द्रावण मिसळून तयार केली जात आहे. अशा प्रकारे क्लोअर आयड्रेट हे विषारी द्रावक मिसळुन केलेली ताडी आरोग्यास हानीकारक असून त्यामुळे ती पिणार्या नागरिकांच्या जिवीताला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे. अशा प्रकारच्या ताडीची नगर शहरासह जिल्हयात ठिकठिकाणी ताडी विक्रीची दुाकने थाटून राजरोसपणे, सर्रास विक्री केली जात आहे. शासन आदेश दरबारी मोजक्याच 21 दुकानांची नोंद आहे. तरीही जिल्हयात सुमारे दिडशेच्यावर ताडीविक्रेची दुकाने थाटली गेली आहेत. तसेच या दुकानांवर निसर्गनिर्मित ताडी मिळणे मात्र दुरापास्त झालेले आहे. अनेकदा ताडीमध्ये विविध प्रकारचे केमीकल मिसळून नागरीकांच्या जिवीता बरोबर खेळण्याचा खेळ आता राज्य उत्पादन अधिकार्यांनी पुढे होवुन बंद करावा अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.