कर्ज पुनर्गठण न केल्यास शेतकरी रस्त्यावर उतरतीलः आ.राहूल बोंद्रे
चिखली, दि. 01 - चिखली तालुक्यातील शेतक-यांचे कर्ज पुनर्गठण होत नसल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. कर्ज पुनर्गठण लवकर न झाल्यास शेतक-यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाल्यास बँक अधिका-यांना शेतक-यांच्या रोषाचा सामना करावा लागेल. यासाठी बँक अधिका-यांनी तात्काळ कर्ज पूनर्गठण करावे. तसेच कर्ज पुनर्गठणातील अडचणी दुर करण्यासाठी आमदार राहुलभाउ बोंद्रे हे बॅक अधिका-यांशी चर्चा करून कर्ज पुनर्गठणातील अडचणी तात्काळ दुर करून शेतकरी बांधवांना कर्ज मिळण्यसाठी विशेष लक्ष देणार असल्याचेही आमदार राहुलभाउ बोेंद्रे यांनी सांगितले.
आज मे महिना संपला तरी शेतक-यांना त्यांच्या हक्काचे कर्ज अद्याप मिळाले नाही. दुष्काळामुळे शेतक-यांना घराचा दैनंदिन खर्च भागविण्यासाठी देखील कसरत करावी लागत आहे. समोर पेरणीचे दिवस असताना खिशामध्ये रूपया देखील नाही अशा परिस्थितीत बि-बियाणे कसे खरेदी करणार, असा प्रश्न शेतकरी बांधवांसमोर उभा असतांना, बँकानी शेतक-यांची कर्ज पुनर्गठणासाठी केलेली अडवणूक ही शेतक-यांच्या जिव्हारी लागणारी आहे. शासनाने कर्ज पुनगर्र्ठणासाठी कार्यवाहीचे आदेश दिलेले असतांना बॅकांनी आपला मनमानी कारभार सुरू ठेवल्यामुळे जून महिना आला तरी कर्ज पुनर्गठण केलेले नाही. यासाठी लवकरच चिखली येथील विविध बँक शाखा व्यवस्थापकांची बैठक बोलावून कर्ज पुनर्गठणाच्या अडचणी दुर करून शेतक-यांना कर्ज मिळावे, यासाठी विशेष प्रयतक् करणार असल्याचे चिखली मतदार संघाचे आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी सांगितले. आमदार राहुलभाउ बोंद्रे कर्ज पुनर्गठणाच्या प्रश्नात लक्ष देणार असल्याने शेतक-यांना दिलासा मिळेल अशी भावना शेतक-यांनी व्यक्त केली आहे.