आंब्याचे भाव घसरले
अहमदनगर। प्रतिनिधी । 05 - सध्या शेतकरी वर्गाला वाईट दिवस आहेत. दुष्काळात होरपळत असलेल्या शेतकर्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याने बळीराज्याच्या अडचणी वाढल्या आहेत. संत्रा फळाप्रमाणे आंब्याचेही भाव आता गडाडले आहेत. सुरवातीला दोन डजनची पेटी सुमारे 1200 पर्यंत विकली जात होती. आता तीच आंब्याची पेटी 500 ते 600 रुपयाला विक्री केली जात आहे.
नगर जिल्ह्यात हापूस, मद्रास, केरळ, गुजरात राज्यातून मोठया प्रमाणावर आंब्याची आवक झाली आहे. हापूस, लालबाग, केशर आंब्याला मोठया प्रमाणावर मागणी आहे. मात्र, आंब्याचे भाव चांगलेच घसरले आहेत. 1200 रुपयाहून थेट 500 रुपयांपर्यंत आंब्याचे भाव आले आहेत, अशी माहिती आंब्याचे व्यापारी पपु आहुजा यांनी दिली. आंब्याचे भाव कोसळ्याने ग्राहकांना अच्छे दिन आले असल्याचे त्यांनी नमूद केले.