समाजातील उपेक्षितांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी जनजागृती आवश्यक
। नगरसेवक डॉ.सागर बोरुडे यांचे प्रतिपादन
अहमदनगर, दि. 05 - ज्या मुलांना शाळेत जाण्याची इच्छा आहे, पण केवळ गरीबीमुळे ते शालेय साहित्य खरेदी करू शकत नाहीत. अशांना ऋषिकेश घाडगे यांनी सामाजिक उपक्रम आयोजित करून शालेय साहित्याचे वाटप केले. हा अत्यंत चांगला व समाजाला दिशा देणारा उपक्रम आहे. त्यांच्या हातून समाजाची अशीच सेवा घडो. येथून पुढील काळात शिक्षणाशिवाय पर्याय नाही. गरीब असो की श्रीमंत त्यामुळे सर्वांनाच शिक्षण मिळाले पाहिजे. समाजातील उपेक्षितांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी जनजागृती आवश्यक असल्याचे प्रतिपादन नगरसेवक डॉ. सागर बोरुडे यांनी केले.गोरगरीब मुलांना शालेय साहित्याचे ऋषिकेश घाडगे यांच्या वतीने सामाजिक उपक्रमांतर्गत वाटप नगरसेवक डॉ. सागर बोरुडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. बोरुडे बोलत होते. यावेळी प्रा. शिवाजी घाडगे, सागर सप्रे, अर्जुन वामन, अर्जुन वायभासे, शंकर खताळ, विशाल जगताप, गणेश पाटोळे, अशोक भोसले, प्रवीण खळेकर, विवेक घाडगे, उमेश घाडगे, अविनाश पंडित, विठ्ठल वामन, सूर्यकांत घुले, श्याम खाकाळ, दीपक चावरिया, चिरंजीव गाढवे, संदीप घोडके आदी उपस्थित होते.
ऋषिकेश घाडगे म्हणाले की, आपल्याला सामाजिक कार्याची आवड आहे. समाजातील उपेक्षितांना मदत केल्याशिवाय, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणल्याशिवाय त्यांचा विकास होणार नाही. त्यांचा विकास होण्यासाठी समाजातील दानशुरांनी पुढे येऊन त्यांना मदत करायला हवी. समाजाचे आपण काही देणे लागतो, ही भावना प्रत्येकामध्ये जागृत झाल्यास गरीब व श्रीमंत यामध्ये पडलेली मोठी दरी दूर होण्यास वेळ लागणार नाही, असे ते म्हणााले.
