Breaking News

जिल्हा रूग्णालयात आरोग्य शिबिर

। सर्वरोग निदान व रक्तदान शिबीराचे उद्घाटन खा.गांधीच्या हस्ते 

 अहमदनगर । प्रतिनिधी । 05 - महाराष्ट्र राज्य पर्यटन, सांस्कृतिक, कला, महोत्सव समितीच्यावतीने जिल्हा रुग्णालय येथे आयोजित मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, सर्वरोग निदान व रक्तदान शिबीराचे उद्घाटन खा.दिलीप गांधी यांच्या हस्ते झाले. 
यावेळी समितीचे अध्यक्ष शेख जाकिर हुसेन, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सोनवणो, डॉ.गाडे, अँड़आर.आर. पिल्ले, विशाल बेलपवार, सामाजिक कार्यकर्ते राजाराम भापकर गुरुजी, राजू पटेल, उमाजी बिसेन, इसरार शेख, फारुक शेख, गौरव ढोणो, पावलस पवार, प्रविण धावरी, मंगेश मोडक, अमित
काळे, रीयाज सय्यद, विशाल गायकवाड, समीर सय्यद, रवी साठे, कय्युम सय्यद, वसीम शेख आदी उपस्थित होते.
गरजू रुग्णांच्या सेवेसाठी समितीच्यावतीने राबविण्यात आलेले शिबीर कौतुकास्पद आहे. तसेच पर्यटनाला चालना देण्यासाठी समितीचे उत्तम कार्य चालू असल्याचे खा. गांधी यांनी सांगितले.  शेख यांनी विविध सामाजिक उपक्रमासह मागील वर्षा प्रमाणो शहरात मोठ्या स्वरुपात सांस्कृतिक कलामहोत्सव घेण्याचा मानस व्यक्त केला. विविध सामाजिक उपक्रम व आरोग्य शिबीर घेतल्याबद्दल खा. गांधी यांनी शेख यांचा सत्कार केला. यावेळी मोठ्या संख्येने रुग्णांची आरोग्य तपासणी करुन त्यांना औषधांचे वाटप करण्यात आले. तसेच उपस्थित कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विशाल बेलपवार यांनी केले तर आभार राजू पटेल यांनी मानले.