जिल्हा राष्ट्रवादीच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी करिअर संधी विषयावर मार्गदर्शन
अहमदनगर, दि. 03 - 10 वी व 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी अहमदनगर शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दि. 27 मे रोजी सायंकाळी 5 वाजता रावसाहेब पटवर्धन स्मारक येथे करिअरच्या विविध संधींविषयी मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती शहर जिल्हाध्यक्षा सौ. रेश्मा आठरे यांनी दिली.
माहिती देताना त्यांनी सांगितले की, विद्यार्थी हे 10-12वी नंतर पारंपरिक मार्ग इंजिनिअर, मेडिकल, आर्किटेक्चर याचा विचार करतात. परंतु त्या व्यतिरिक्त करिअरसाठी असंख्य मार्ग उपलब्ध आहेत. या मार्गाचे अवलंबन करताना पालकांनी आपल्या पाल्याची कुवत आणि रुची लक्षात घेऊन याचा अवलंब करावा आणि त्याचे मार्गदर्शन सुकन्या फणसाळकर करमार आहेत. फणसाळकर या प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ असून, करिअर डेव्हलपमेंटचे समुपदेशन करतात. या सत्रात करिअरचे वेगवेगळे मार्ग, तसेच भारतात व परदेशात उपलब्ध असलेल्या संधी याचे मार्गदर्शन, तसेच करिअरसाठी तयारी आणि व्यक्तिमत्त्व विकास यांचे सविस्तर माहिती यामध्ये दिली जाईल. करिअर दृष्टीने उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या संस्था, तसेच या संबंधीत सविस्तर माहिती या सोबत देण्यात येईल. वैज्ञानिक दृष्ट्या समुपदेशन पद्धती यामद्ये देण्यात येईल आणि याचे महत्त्व सांगितले.मोबाईल एडीक्शन यामध्ये मोबाईल एडीक्शनचे महत्त्व सांगितले जाईल व टेस्ट करून प्रात्यक्षिक दाखविले जाईल. मोबाईलपासून होणारे फायदे व त्रुटी यांचे सविस्तर ज्ञान विद्यार्थ्यांना पटवून दिले जाईल. तसेच यामध्ये समुपदेशन संस्थांची नोंदणीविषयक माहिती दिली जाईल. तरी सर्व विद्यार्थी, पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अहमदनगर शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे. या संधीचा लाभ घ्यावा.