। गोरेगाव येथील माजी सैनिक व मंथन प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरसाळेंचे प्रतिपादन
पारनेर, दि. 03 - पारनेर तालुका सैनिक सहकारी बँक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. आगामी काळात बँकेचा कारभार सुरळीत चालण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या विचारांची माणसे बँकेच्या संचालक पदावर आली पाहिजे, असे प्रतिपादन गोरेगाव येथील माजी सैनिक व मंथन प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब नरसाळे यांनी केले. तालुक्यातील भाळवणी येथील मंगल कार्यालयात आयोजित माजी सैनिक मेळाव्याप्रसंगी श्री. नरसाळे बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सैनिक कॅप्टन विठ्ठल वराळ होते. श्री. नरसाळे म्हणाले की, ’देशाचा प्रपंच करताना स्वत: चा प्रपंच मात्र नेटका करावा’ या उक्तीप्रमाणो पद्मभूषण ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या विचारांवर आधारित व्यक्तींचीच निवड बँकेवर व्हावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. या मेळाव्यात माजी सैनिक सुंदर मेहेर, गुलाबराव सालके, ताराचंद गुंजाळ, कॅप्टन बाळासाहेब गुंजाळ, सहदेव घनवट, विठ्ठल औटी, अनिल थोरात आदींनी विचार मांडले. या वेळी माजी सैनिक संजय कोल्हे, सुलतानभाई, श्री. भनगडे, श्री. तराळ, गणोश पोटघन, भाऊसाहेब चेमटे, सोन्याबापू नरसाळे, संतोष यादव, श्री. शेळके, भगवान नांगरे, रामदास तांबे, जयसिंग ठाणगे, सुभेदार प्रभाकर पवार, दादाभाऊ कोल्हे, गोरख दुधाडे, हरिभाऊ दुधाडे आदी उपस्थित होते.