Breaking News

शिक्षणअधिकार्‍यावर कारवाईसाठी आमरण उपोषण

बुलडाणा, दि. 02 - शिक्षण अधिकारी माध्यमिक यांनी अतिरिक्त शिक्षक यांना नियमबाह्य संच मान्यता दिली. सबब त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी स्वाभिमानी रिपब्लीकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष विद्यासागर अंभोरे यांनी आज दि.1 जुन पासून जिल्हाधिकारी कार्यालयापुढे उपोषण सुरु केले आहे. 

श्री शिवाजी विद्यालय रायुपर, येथे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षण सेवकास शिक्षण अधिकारी माध्यमिक यांनी नियमबाह्य संच मान्यता दिली असा आरोप करीत स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष भाई विद्यासागर अंभोरे यांनी उपोषण सुरु केले आहे. आणि शिक्षण अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुख्याध्यापक/प्राचार्य श्री शिवाजी विद्यालय रायपुर यांना दिलेल्या माध्यमिक शाळा संहिता प्रमाणे अतिरिक्त होणारे शिक्षक हा शिक्षण सेवक पदावर असेल आणि त्याचा शिक्षण सेवक कालावधी पुर्ण झाला नसल्यास त्याची सेवा तत्काळ समाप्त करण्यात यावी असे असतांना शिक्षणाधिकारी यांनी अतिरिक्त शिक्षक जी.बी.देशमाने यांची सेवा समाप्त केली नाही.
संच मान्यतेप्रमाणे जी.बी.देशमाने हे सर्वात शेवटचे कनिष्ठ शिक्षण सेवक (अस्थाई) होते. त्यावेळी त्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे जादा ठरविले होते. शासन नियमाप्रमाणे जादा होणारे शिक्षण सेवक खुल्या प्रवर्गातील असल्यास त्याची सेवा तात्काळ समाप्त करण्यात याववी असे आदेशीत होते. परंतू शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी देशामाने यांना अतिरिक्त संच मान्यता दिली. शासनाचे नियम धाब्यावर बसवून न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली केली असल्यामुळे शिक्षणाधिकारी व संबंधीत अधिकार्‍यांवर फौजदारी गुन्हे दाखल करुन भ्रष्टाचाराची चौकशी करुन त्यांना निलंबीत करण्यात यावे तसेच अतिरिक्त ठरलेल्या शिक्षण सेवक देशमाने यांना त्वरीत सेवामुक्त करावे अशी मागणी करण्यात आली आहे.