उक्कडगावात गुरुवारी आदर्श माता - पिता कृतज्ञता सोहळा
। म्हस्के प्रतिष्ठानच्या व्यायामशाळेचे उद्घाटन
अहमदनगर, दि. 08 - नगर तालुक्यातील उक्कडगाव कै.भाऊराव पाटील म्हस्के ग्रामीण बहुउद्देशीय प्रतिष्ठानने उभारलेल्या अत्याधुनिक व्यायामशाळेचे उद्घाटन व आदर्श माता पिता कृतज्ञता सोहळा गुरूवार दि.9 जून रोजी आयोजित करण्यात आला आहे. उक्कडगाव येथे सायंकाळी 6 वाजता होणार्या या सोहळ्यात आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपट पवार यांच्या हस्ते व्यायामशाळेचे उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.राम शिंदे हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.डॉ.विजय म्हस्के यांनी दिली. ग्रामीण भागातील युवकांनी व्यसनापासून दूर राहून व्यायामाकडे लक्ष द्यावे या उद्देशाने प्रतिष्ठानने गावात अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज व्यायामशाळेचे उभारणी केली आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या व्यायामशाळा विकास अनुदान योजनेंतर्गत ही व्यायामशाळा बांधण्यात आली आहे. या व्यायामशाळेच्या लोकार्पणानिमित्त गावातील आदर्श माता पितांचा तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा होणार आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आ.शिवाजीराव कर्डिले, आ.संग्राम जगताप, महापौर अभिषेक कळमकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड, शिवसेनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे, दै.सकाळचे निवासी संपादक बाळ ज.बोठे पाटील, जिल्हा क्रिडा अधिकारी अनिल चोरमले, जि.प.सदस्य बाळासाहेब हराळ, सभापती संदेश कार्ले, संपत म्हस्के, प्राचार्य डॉ.राजकुमार देशपांडे, पोपटराव म्हस्के, मुकेश मुळे, नगरसेवक सुभाष लोंढे, बाळासाहेब पवार, प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूर शेख, पोपटराव निमसे, दत्ता नारळे, सरपंच नवनाथ म्हस्के, अॅड.जयंत जाधव, विलास दवणे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात कवी अमोल बागूल हे माता पित्यांवरील कविता सादर करणार आहेत. उक्कडगाव येथील या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे संस्थापक प्रा.एल.बी.म्हस्के,पंढरीनाथ म्हस्के, बाळासाहेब म्हस्के, पांडुरंग म्हस्के, एकनाथ म्हस्के, प्रकाश म्हस्के, सुहास म्हस्के आदींनी केले आहे.
