अहमदनगर जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटनेची कार्यकारणी जाहीर
अहमदनगर, दि. 08 - अ.नगर जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटनेची सर्वसाधारण सभा सुयोग मंगल कार्यालय येथे संपन्न झाली. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी बी. जे. बडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली, तसेच संघटनेची जिल्हा कार्यकारिणीही जाहीर करण्यात आली.
संघटनेच्या कार्याध्यक्षपदी ए. आर. कचरे, उपाध्यक्षपदी बी. एम. गुंजाळ, डी. एम. निघळे, कार्यकारी सचिवपदी ए. आय. शेख, सहसचिवपदी ए. डी. नगरकर, डी. व्ही. बुरला, खजिनदारपदी एस. एन. कडु, सहखजिनदारपदी युवराज गुंजाळ, सदस्य सल्लागारपदी सुनील लामदांडे
, लघु लेखक प्रतिनिधीपदी सौ. एस. व्ही. राणे, बेलीफ प्रतिनिधीपदी चंद्रकांत भिंगारदिवे, शिपाई प्रतिनिधीपदी एस. आय. कदम, महिला प्रतिनिधीपदी सौ. ए. पी. झिंजे, सदस्यपदी डी. बी. शिंदे, के. एस. बोराटे, एस. बी. राऊत, पी. डी. कुलकणी यांची निवड करण्यात आली.
यावेळी संघटनेच्या सर्व नूतन पदाधिकार्यांचा, तसेच महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघाच्या कार्यकारी सदस्यपदी न्यायालयीन कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन एस. डी. ढाळे व बेलीफ संघटनेच्या अध्यक्षपदी चंद्रकांत भिंगारदिवे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राज्य कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष आर. के. नरशीकर, उपाध्यक्ष अविनाश नगरकर, सचिव निकम, कार्य. सदस्य मोरवाल, सावळेराम कदम, अधीक्षक कुसळकर, बीडकर आदी उपस्थित होते.आर. के. नरशीकर म्हणाले की, न्यायालयीन कर्मचार्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून, ते सोडविण्यासाठी हायकोर्ट व राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. काही मागण्या मान्य झाल्या असून, इतर मागण्या मान्य होण्यासाठी प्रयत्नशील आहोत. एकजुटीने लढा दिल्यास हे प्रश्न सुटू शकतील, असे ते म्हणाले. बी. जे. बडे म्हणाले की, अ.नगर जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटनेच्या सर्व सदस्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध आहोत. संघटनेच्या अध्यक्षपदी आपणा सर्वांमुळे माझी बिनविरोध निवड झाली. सर्वांना बरोबर घेऊन काम करू. संघटनेच्या माध्यमातून विविध उपक्रमांचे व कार्यक्रमांचे आयोजन करू, असे ते म्हणाले.