Breaking News

रिओ ऑलिंपिक - मेरी कोमसाठी वाइल्ड कार्डची मागणी

नवी दिल्ली, दि. 02 - लंडन ऑलिंपिक्समध्ये कांस्य पदक विजेती भारताची मुष्टीयुद्धपटू मेरी कोम रिओ ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेली नसली तरी तिच्यासाठी वाईल्ड कार्ड एंट्री मागण्याचा निर्णय भारतीय बॉक्सिंग च्या तदर्थ समितीने घेतला असल्याचे समितीचे प्रमुख किशन नारसी यांनी सांगितले. ते म्हणाले मेरी भारताची एकमेव पदक विजेती महिला बॉक्सर आहे. तिने खेळासाठी खूप मोठे योगदान दिले आहे त्यामुळे रिओ ऑलिंपिकसाठी तिला वाईल्ड कार्ड एंट्री दिली जावी यासाठी आम्ही आंतरराष्ट्रीय अ‍ॅम्यॅच्युअर बॉक्सिंग संघाकडे प्रस्ताव पाठविला असून त्यांच्या निर्णयाची आम्ही प्रतीक्षा करत आहोत.
33 वर्षीय मेरी विश्‍वचॅपियन स्पर्धेत 51 किलो वजनी गटात जर्मनीच्या एजाईज निमानीकडून हरली आहे. त्यामुळे ती रिओसाठी पात्र ठरू शकली नाही. मेरीने या संदर्भात प्रतिक्रीया देताना पुढे काय होतेय ते पाहू इतकेच सांगितले आहे.