विराट दररोज कमवतो दीड कोटी !
नवी दिल्ली, दि. 02 - भारतीय क्रिकेट व क्रिकेट जगताचा विराट कोहली हा उगवता सुर्य झाला आहे. मैदानात त्याचे नशीब व त्याची तळपती बॅट चमकत आहे. याचमुळे जाहिरात कंपन्यांमध्येसुद्धा त्याला करारबद्ध करण्याची शर्यत लागलेली आहे. विराट कोहली सध्या 13 ब्राण्डसोबत करार करीत आहे. यात एमआरएफ, पेप्सी, ऑडी, विक्स, बुस्ट, यूएसएल, टीव्हीएस, स्मॅश, नितेश इस्टेट्स, टिसॉट, हर्बालाइ
फ, आदिदास व कोलगेटचा समावेश आहे. यापैकी आदिदास असा ब्राण्ड आहे की, कधीकाळी सचिन तेंडुलकर त्याचा सदिच्छा दूत राहिला होता. कोहली आपल्या ब्राण्डकडून दिवसाला 1.5 कोटी रुपये कमावतो आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनीची कमाई 1 कोटी आहे.
शारीरिक व मानसिक रुपाने कोहली बराच मजबूत असून निर्भयसुद्धा आहे. जाहिरातदारारांना एका अॅम्बेसॅडरमध्ये जे अव्वल पाच वैशिष्ट्ये हवी असतात, ती सर्व गुणवैशिष्ट्ये विराटमध्ये आहे, असे जाहिरात कंपन्यांचे म्हणणे आहे. सदिच्छा दूत बनण्यासाठी बॉलीवूडमध्ये अनेक स्टार्स आहे, परंतु आपल्या याच वैशिष्ट्यांमुळे विराटने जाहिरातदारांना चंदेरीनगरीच्या पलिकडे बघण्याची दृष्टी दिली आहे. याच कारणांमुळे विराट इतक्या कमी वयात इतका यशस्वी आहे.
विराटचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे त्याच्यामध्ये दोन दिग्गज क्रिकेटपटूंचा मेळ आहे. त्याच्यात सौरव गांगुलीची आक्रमकता व सचिन तेंडुलकरसारखा दर्जेदारपणा. सचिन फार लाजाळू आहे, तर विराट एकदम बिनधास्त आहे. विराटमध्ये जगाशी सामना करण्याचा आत्मविश्वास व वैशिष्ट्ये आहे. तो कोणतीही जबाबदारी सांभाळण्यास मागे हटत नाही.
बॅटच्या जोरावर कमाई करण्याच्या बाबतीत गतवर्षापर्यंत कर्णधार धोनीच विराट कोहलीपेक्षा समोर होता. धोनी बॅटच्या जाहिरातीच्या कमाईतून 6 कोटी जमा करीत होता, परंतु आता विराटची बॅटच्या जाहिरातीतून 8 कोटी कमाई होत आहे. धोनी स्पार्टनच्या बॅटचा प्रचार करीत असून त्याला 6 कोटी मिळते, तर विराट एमआरएफची जाहिरात करतो. बॅटवर त्याची स्टिकर लावली जाते व त्यातून विराटला 8 कोटी रुपये मिळतात.