पंतप्रधान वाढवतात दिल्ली सरकारपुढील अडचणी
नवी दिल्ली, दि. 03 - दिल्ली सरकारपुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग हे अडथळे निर्माण करीत असल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. भाजपचे आमदार आणि विरोधी पक्षनेते विजेंदर गुप्ता यांनी दिल्लीमध्ये मोबाईल अॅपवर आधारित बस सेवेमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला. त्यावरून दिल्लीतील भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने तपासाला सुरुवात केली आहे.
केजरीवाल सरकारने ही अॅप सेवा गुरगावमधील बस समूहकांना फायदा व्हावा, यासाठी सुरू केल्याचा आरोप गुप्ता यांनी केला होता. योजना सुरू करण्यापूर्वी आपली मंजुरी घेतली गेली नव्हती या कारणास्तव दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनीही या योजनेच्या प्रारंभाला विरोध केला होता.
केजरीवाल यांनी त्या पार्श्वभूमीवर मोदी आणि जंग या दोहोंवर दिल्ली सरकारपुढे अडथळे उभे करण्याचा आरोप केला आहे. बहुतेक प्रत्येक प्रकरणांमध्ये मोदी नायब राज्यपालांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवत असतात, असे केजरीवाल म्हणाले. दिल्ली सरकारच्या नियोजनानुसार अॅप बस सेवा कालपासून सुरू होणे अपेक्षित होते. मात्र या योजनेला विलंब व्हावा, यासाठी कारस्थान केले जात असल्याचा आरोप दिल्ली सरकारमधील एका वरिष्ठ अधिका-याने केला आहे. दिल्लीतील पंतप्रधान, नायब राज्यपाल आणि केजरीवाल यांच्यातील वाद केजरीवाल यांच्या वक्तव्याने पुन्हा चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.