मोदींना पाठींबा देऊन घोडचूक केली
नवी दिल्ली, दि. 02 - 2014मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठींबा देऊन चूक झाल्याचे सांगत ज्येष्ठ विधिज्ञ व माजी केंद्रीय मंत्री राम जेठमलानी यांनी त्याबद्दल मी देशातील नागरिकांची माफी मागतो, असे म्हटले आहे.
मोदींना लक्ष्य करताना जेठमलानी यांनी म्हटले आहे की, निवडणुकीपूर्वी परदेशातील काळा पैसा भारतात परत आणण्याचे आश्वासन मोदींनी दिले होते. ते त्यांनी अद्याप पूर्ण केलेले नाही. मोदी सरकारने लोकांना फसवले आहे आणि मी त्यांना पाठींबा दिला होता. ती एक चूक होती आणि त्याबद्दल मी सर्व जनतेची माफी मागतो.
काळा पैसा देशात परत आणावा हीच मोदी सरकारकडून अपेक्षा असल्याचे सांगत जेठमलानी म्हणाले, परदेशातील 90 लाख कोटी रुपये देशात परत आणून प्रत्येक गरीब व्यक्तीला 15 लाख रुपये देण्याचे आश्वासन मोदींनी दिले होते. मात्र त्यांचेच पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी ते आश्वासन एक निवडणूक जिंकण्यासाठी केलेली एक युक्ती असल्याचे वक्तव्य केले आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी राम जेठमलानी यांना बिहारच्या महायुतीतील राष्ट्रीय जनता दल युनायटेडकडून उमेदवारी देण्यात आली आहे. पक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल राम जेठमलानी यांची भारतीय जनता पक्षाने मे 2013 मध्ये पक्षातून हकालपट्टी केली होती.