ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांचे निधन
मुंबई, दि. 05 - ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांनी आज वृद्धापकाळाने राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 80 वर्षांच्या होत्या. मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवणार्या सुलभा देशपांडे यांच्या निधनामुळे अवघ्या चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. प्रेक्षकांच्या मनावर सुलभा देशपांडे यांच्या अनेक भूमिकांनी छाप पाडली. शांतता! कोर्ट चालू आहे, चौकट राजा या चित्रपटातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. मागील एक-दोन वर्षात आलेल्या विहीर, हापूस या चित्रपटातही त्यांनी काम केले होते. मराठीच नाही तर आदमी खिलौना है, गुलाम-ए-मुस्तफा, विरासत या हिंदी चित्रपटातील त्यांच्या भूमिका लक्षवेधी होत्या.
