Breaking News

विंडीजचा द. आफ्रिकेवर चार गडी राखून विजय

गयाना, दि. 05- वेस्ट इंडीजने तिरंगी मालिकेत सुनील नारायणचे सहा बळी आणि किरॉन पोलार्डचे नाबाद अर्धशतकामुळे दक्षिण आफ्रिकेवर चार गडी राखून  सहज विजय मिळविला.
दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना वेस्ट इंडीजच्या संघात पुनरागमन करणारा ऑफस्पिनर सुनील नारायणने आपल्या फिरकीवर मैदानावर स्थिरावूच दिले नाही. त्याने  कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करत अवघ्या 27 धावात सहा बळी घेतले. त्याच्या कामगिरीमुळे दक्षिण आफ्रिकेचा डाव 47व्या षटकातच अवघ्या 188धावांत  संपुष्टात आला. दक्षिण आफ्रिकेकडून फक्त रिली रुसॉ हा अर्धशतकी खेळी करू शकला. त्याने 83 चेंडूत 61धावा केल्या. कर्णधार एबी डिव्हिलर्सने 31 धावांची  खेळी करत संघाची धावसंख्या दीडशेच्या पार नेली.
विडींजची या आव्हानासमोर सुरवात खराब झाली होती. जॉन्सन चार्ल्स आणि आंद्रे फ्लेचर यांना इम्रान ताहीरने बाद करत विंडीजला दोन धक्के दिले. सॅम्युअल्सही  फक्त एक धावेवर परतला. अखेर पोलार्डने एकाबाजूने धावा जमावत रामदीन, ब्रेथवेट आणि होल्डरच्या साथीने संघाला विजय मिळवून दिला. पोलार्डने 67 चेंडूत  2 चौकार आणि सहा षटकारांसह 67 धावा केल्या. सुनील नारायणला सामन्याचा मानकरी म्हणून घोषित करण्यात आले.