मानधना महाविद्यालयात ‘एच.एस.सी‘ परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार
अहमदनगर, दि. 06 - श्रीरामकृष्ण एज्युकेशन फौंडेशनचे मोहनलाल रामअवतार मानधना कनिष्ठ महाविद्यालयाचा वाणिज्य शाखेचा निकाल प्रतिवर्षी प्रमाणे 100% लागला आहे. या परीक्षेत कु.तोष्णीवाल स्नेहल शैलेश ही विध्यार्थिनी 86.15% गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. कु.दोशी धनश्री संतोष हि विध्यार्थिनी 84.44% गुण मिळवून द्वितीय तर कु.चव्हाण वर्षा कैलास ही 83.53% गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. या विध्यार्थीनिंचा अध्यक्ष बाळासाहेब गांधी व उपाध्यक्ष मोहनलाल मानधना यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बजरंग दरक , प्राचार्या सौ.गिता गिल्डा , प्राध्यापिका संपदा देशपांडे उपस्थित होत्या .
औदयोगिक विकास व येणारे नवनवीन उद्योग यामुळे भविष्यात सीए ची वाढती गरज पाहता या तिन्ही विध्यार्थिनीनी सीए होण्याचा मानस व्यक्त केला. या महाविद्यालयात वाणिज्य शाखे बरोबरच विज्ञान शाखा ही मागील वर्षापासून सुरु करण्यात आली आहे. विध्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक सुसज्ज प्रयोगशाळा ही उपलब्ध आहे. या महाविद्यालयाचे विध्यार्थी अभ्यासा बरोबरच इतर स्पर्धांमध्येही सुयश संपादन करतात.तरी विध्यार्थ्यांनी येथे प्रवेश घेऊन या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्यांनी केले आहे.सर्व यशस्वी विध्यार्थ्यांचे संस्थेचे पदाधिकारी अध्यक्ष बाळासाहेब गांधी, चेअरमन श्रीगोपाल धूत, सेक्रेटरी डॉ.शरद कोलते व उपाध्यक्ष मोहनलाल मानधना यांनी अभिनंदन केले.