पाण्यासाठी चिमुकल्यांचीही पायपीट
अहमदनगर, दि. 06 - आज शहरात पाण्याची समस्या काही भागात चांगलीच भेडसावताना दिसत आहे. शहरताील अनेक भागात एक दिवसाआड, तर काही भागात चार दिवसाआड पाणी मिळत आते असे असले तरी काही भागात अद्यापही मनपाचे पाणी पोहचत नसल्याने त्या भागात मनपा विषयी नाराजी आहे तर आजच्या परिस्थितीत जेथे पाणी मिळेल तेथून पाणी मिळवणे हाच दिनक्रम असल्याने अनेक शहराजवळील महिलांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. कधी कधी पायपीट करुनही पाणी मिळेलच असे सांगता येत नाही. आज अशाच एका चिमुकलीने पाण्यासाठी वनवन करुन पाण्यासाठी पायतान नसताना पाणी मिळवण्यासाठी भर उन्हात पायपीट केली असल्याचे चित्र महेश कांबळे यांनी आपल्या कॅमेर्यात टिपले आहे.
सध्या जुन महिना उजेडाल असला तरी पाण्याची परस्थिती गंभर आहे. वेदशाळेने पावसाची शक्यता वर्तवल्याने आता सर्वांचे लक्ष हे आकाशाकडे लागले आहे. पावसाची शक्यता दर्शवली आहे. मात्र काही तुरळक भागातच पावसाने हजेरी लावली आहे. परंतु, महाराष्ट्रातील अनेक ठिकाणे अद्यापही कोरडाच असल्याचे चित्र आहे.
पाण्यासाठी दाहीदिशा असे म्हंटले तर ही चिमुकली पाण्यासाठी वणवण करत असल्याचे दिसते. या चिमुकलीने पायात चप्पन न घालता रणरणत्या उष्णात पाण्यासाठी पायपीट करताना दिसत आहे. तर रणरणत्या उन्हात रस्ता पार करताना चिमुकली.
आज पर्यावरण दिन असल्याने महाराष्ट्रभर पावसाने गेल्या चार पाच वर्षापासून दडी मारल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठा गंभीर झाला आहे. यावरुन आपण आता सर्वांनीच निसर्गाचा सन्मान करणे गरजेच झाले आहे. पर्यावरण रक्षण ही कायम लोकचळवळ झाली पाहिजे, प्रदूषित पाणी प्रक्रिया न करता नदीत सोडणार्या उद्योगांवर काय कारवाई करणार? महानगरातील सांडपाणी थेट नद्यांमध्ये, समुद्रात सोडण्यावर आपल्या विभागाने निर्बंध आणले असून; महानगरपालिका व नगरपालिका यांना आपल्या बजेटमध्ये 25 टक्के निधी हा सांडपाणी व्यवस्थापन आणि कचर्याचे नियोजन यावर राखीव ठेवण्याचे व यासाठीच खर्च करण्याचे बजावले असून, नद्यांचे प्रदूषण कमी करण्यातआम्हाला आगामी काळात नक्कीच यश येईल असे अनेकांनी सांगीतले आहे.निसर्गाशी खेळ मांडल्याने हा दुष्काळाचा खटाटोप सुरु आहे.

