दहावीच्या निकालात पुन्हा कोकण अव्वल
पुन्हा एकदा मुलीच ठरल्या सरस
पुणे, दि. 06 - राज्यातील 89.56 टक्के मुले यंदाच्या दहावीच्या परीक्षेत उत्तीर्णझाली असून सालाबाद प्रमाणे यावेळी देखील मुलीच मुलांपेक्षा सरस ठरल्या आहेत. दहावीला बसलेल्या 91.42 टक्के मुली पास झाल्या आहेत. तर राज्यातली 87.98 टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत.
नेहमीप्रमाणेच कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल लागला आहे. कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात तब्बल 97 टक्के निकाल लागला आहे. मात्र यंदा दुष्काळाने होरपळणार्या लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 81.54 टक्के लागला आहे. येत्या 18 जुलैला 10वीची फेर परीक्षा घेण्यात येणार असल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे. दुपारी 1 वाजल्यानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे.
