शिवमय झाला किल्ले रायगड
रायगड, दि. 06 - आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा 342 वा शिवराज्याभिषेक दिन असून किल्ले रायगडावर यानिमित्त अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीतर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हजारो शिवभक्त गेल्या दोन दिवसांपासून शिवराज्याभिषेक दिनाच्या सोहळ्यासाठी रायगडावर दाखल झाले आहेत.
शिवराज्याभिषेकाचा सोहळा कोल्हापूरचे छत्रपती युवराज संभाजीराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा होणार असून यासाठी शुक्रवारीच कोल्हापूर हायकर्सची एक तुकडी जलकुंभासह गडावर दाखल झाली. तर शिवधनुष्य प्रतिष्ठानचे कार्यकर्ते शिवनेरीहून पालखी घेऊन गडावर दाखल झाले आहेत. शिवराज्याभिषेक समितीच्या वतीने सोहळ्यानिमित्त मेघडंबरीतील शिवछत्रपतींचा पुतळा, होळीच्या माळावरील शिर्काई मंदिराबरोबरच गडाची स्वच्छता करण्यात आली आहे.
कार्यक्रमाची सुरुवात आज पहाटे साडे पाच वाजता ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर सकाळी दहा वाजता मुख्य राज्याभिषेक दिन सोहळ्याला सुरुवात झाली आहे. छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीवर सुवर्णमुद्रांचा अभिषेक होईल. त्यानंतर छत्रपती राजघराण्याच्या राजपुरोहिताच्या मंत्रोच्चारात राज्याभिषेक सोहळा पार पडेल.