पुढील महिन्यापासून केंद्रीय कर्मचार्यांना वाढीव पगार !
नवी दिल्ली, दि. 02 - पुढील महिन्यात खूप मोठी खुशखबर गेल्या अनेक दिवसांपासून चातकासारखी वाट पाहणार्या केंद्रीय कर्मचार्यांना मिळणार असून पुढील महिन्यात सातव्या वेतन आयोगाने केलेल्या शिफारसीनुसार वाढीव पगार केंद्रीय कर्मचार्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता असून याबाबत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार, नवीन वाढीव पगार हा पुढील महिन्यापासून देण्यात येणार आहे.
येत्या 11 जूनला या संदर्भात केंद्रीय सचिवांच्या गटांची बैठक होणार असून याचे नेतृत्व कॅबिनेट सचिव पी के सिन्हा करीत आहेत. त्यावळी ते सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसींना अंतीम रूप देणार आहे. सरकारने गेल्या जानेवारीमध्ये पी के सिन्हा यांच्या नेतृत्त्वाखाली उच्च स्तरिय समिती स्थापन केली. ही समिती सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसींचे विश्लेषण करणार आहे. सातव्या वेतन आयोगाचा फायदा 47 लाख केंद्रीय कर्मचार्यांना आणि 52 लाख पेन्शनरला होणार आहे.