Breaking News

श्रीगोंद्याच्या विकासात पाचपुतेंचे योगदान मोठे ः पालकमंत्री शिंदे

श्रीगोंदा, दि. 01 - श्रीगोंद्याच्या विकासात माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे योगदान मोठे आहे असे प्रतिपादन पालकमंत्री राम शिंदे यांनी श्रीगोंदा येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना केले . 
 पालकमंत्री प्रा ,राम  शिंदे हे काल श्रीगोंदा येथे आले असताना माउली निवास स्थानी कार्यकर्त्यांनी शिंदे यांचा सत्कार केला यावेळी अध्यक्ष स्थानी माजी मंत्री बबनराव पाचपुते होते तर मंचावर जेष्ट नेते अरुण हिरडे ,दादाराम ढवान ,पंचायत समिती सद्श राजेंद्र म्हस्के ,  भाजप चे तालुकाध्यक्ष बाळासाहेब महाडिक ,महिला अध्यक्षा सुनिता शिंदे ,डॉ स्मिता तरटे मेहर जकाते,सुवर्णा पाचपुते    ,मनोहर पोटे ,सतीश पोखरणा ,दीपक शिंदे ,नगरसेवक भागचंद घोडके ,डॉ अनिल घोडके व भाजप च्या सर्व आघाड्यचे पदाधिकारी उपस्थित होते
यावेळी पुढे पालकमंत्री शिंदे म्हणाले मी ज्यावेळी श्रीगोंद्यात शिक्षण घेत होतो त्यावेळी श्रीगोंदा हे मोठे खेडे होते पण त्यानंतर माजी मंत्री पाचपुते यांनी श्रीगोंद्याच्या विकासाची घोडदौड सुरु केली व श्रीगोन्द्याला गावपण मिळवून देण्यात पाचपुते यांचे मोठे योगदान आहे पाचपुते यांच्यामुळेच श्रीगोंदा शहराचा व तालुक्याचा विकासाचा दर वाढला आहे
माजी मंत्री पाचपुते आता जरी पदावर नसले तरी त्याचा आदेश मानणारे सरकार राज्यात आहे त्यामुळे त्यांनी श्रीगोंद्याच्या विकासाचा ध्यास सोडलेला नाही श्रीगोंदा तालुक्यात विजेचा प्रश्‍न कायम स्वरूपी सोडविण्यासाठी पाचपुते यांनी मंत्रालयात येवून पाठपुरवा केला आहे त्यामुळे इन्फ्रा ची कामे लवकर पूर्ण  करण्याबाबत बैठक आयोजित करण्यात येणार आहे तसेच शहराच्या विकासात महत्वाची 10 नंबर चारी आहे या चारीचे काम दोन खात्याच्या अडचणी मुळे रखडले होते मात्र आता माळढोक चा प्रश्‍न मार्गी लागल्यामुळे  त्यासाठीही पाचपुते यांच्या मागणी नुसार लवकरच बैठक घेवून तोडगा काढण्यात येणार आहे असे शिंदे म्हणाले
त्याच बरोबर श्रीगोंदा शहरातील सरस्वती नदी खोलीकरण करण्याचे काम लोकसहभागातून चालू आहे या कामास जिल्हा नियोजन मंडळाकडून निधी द्यावा अशी मागणी माजी मंत्री पाचपुते यांनी केली आहे त्यामुळे या कामासाठी लवकरच जास्तीत जास्त निधी देण्याची ग्वाही पालकमंत्री शिंदे यांनी दिली
कुकडी पाणी प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी  बोगदा गरजेचा ः
कुकडी च्या पाण्याबाबत नेहमीच अडचणी येतात डिंभे येथील वितरिका अतिशय जुन्या झाल्या आहेत त्यामुळे पाण्याची गळती वाढत असल्यामुळे माजी मंत्री पाचपुते यांनी या भाग्तून डिंभे ते माणिकडोह बोगदा काढण्यासाठी आग्रह धरला आहे या कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार असल्यामुळे सरकार या प्रश्‍नाकडे गांभीर्याने पाहत आहे असे पालकमंत्री शिंदे म्हणाले.