Breaking News

लोकमंथनच्या बहुजन अस्मिता बचाव लढाईला अखेर यश

किशोर पाटीलवर कारवाईचे तामसेकरांनी दिले संकेत

मुंबई, विशेष/प्रतिनिधी, दि. 02 - महापुरूषांच्या तैलचित्र अवमान प्रकरणी दै.लोकमंथनने सुरू केलेली लढाई आणि या लढाईला तमाम बहुजन संघटनांनी  दिलेले पाठबळ या संयुक्त प्रयत्नांना यश प्राप्त झाले असून पुराव्यांची शहनिशा करून कार्यकारी अभियंता किशोर पाटील यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत साबां  प्रशासनाने दिले आहेत.
मुंबई रस्ते विकास संकल्प चित्र विभागाचे कार्यकारी अ

भियंता किशोर पाटील यांनी मनमानी कारभार करीत असतांनाच महापुरूषांची अवहेलना सुरू केली होती.  आपल्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर इतकेच नाही तर लोकमान्य टिळक,  महात्मा गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विहित आकारातील तैलचित्र लावण्यास नकार दिला. भिंतीला असलेली या महापुरूषांची तैलचित्रे काढून अडगळीत  ठेवले. यासंदर्भात सर्वप्रथम दै. लोकमंथनने बातमी प्रसिध्द करून बहुजनांची अस्मिता जागी करण्याचा प्रयत्न केला. सुरूवातीला साबां प्रशासनाने हा घृणास्पद  प्रकार आणि त्यासंदर्भात प्रसिध्द होत असलेल्या लोकमंथनच्या वृत्तमालिकेकडे साफ दुर्लक्ष केले होते. तथापि लोकमंथनने केलेला पाठपुरावा आणि त्यातून जागी  झालेली बहुजनांची अस्मिता अधिक आक्रमक होत असल्याचे लक्षात येताच साबां प्रशासनही नरमले आणि पुरावे तपासून कार्यकारी अभियंता किशोर पाटील  यांच्या मुजोरीला वेसण घालण्याचे संकेत साबां सचिवांनी दिले.
यासंदर्भात, साबांसचिव सी.पी.जोशी यांच्यासह सचिव तामसेकर यांनीही स्वतः लक्ष घालून चौकशी करण्याचे आश्‍वासन दिले आहे. ओबीसी सेवा महासंघाचे  प्रदेशाध्यक्ष अशोक सोनवणे यांच्याशी चर्चा करतांना सचिव तामसेकर यांनी किशोर पाटील यांच्या मुजोरीची साक्ष देणारे पुरावे द्या तात्काळ कारवाई करतो असे  आश्‍वासन दिले. दरम्यान नाशिक स्थित भिमशक्ती सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अविनाश आहेर यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव साबां  सचिव यांना निवेदन देऊन किशोर पाटीलच्या मुजोरीच्या मुसक्या आवळण्याची मागणी केली होती. एकुणच या प्रयत्नांना यश आले असून लवकरच किशोर  पाटील यांच्यावर कारवाई होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
विधानसभा सभापतींनाही लावला चुना
साबांतील भुजबळ प्रवृत्तीची पिलावळ किती गेंड्याच्या कातडीची आहे. किंबहुना त्यांची कातडी गेंड्यापेक्षाही टणक असल्याचा अनुभव दस्तुरखुद्द  विधानसभा सभापती हरिभाई बागडे यांच्या मतदार संघातही येत आहे. औरंगाबाद साबां प्रादेशिक विभागातील कार्यसंहिता आणि प्रशासकीय नियम धाब्यावर  बसवून कोट्यवधींची हेराफेरी सुरू असल्याचे निष्पन्न झाले आहे. अधिक्षक अभियंता ए.बी.सुर्यवंशी (फुलंब्री) यांच्या इशार्‍यावर कार्यकारी अभियंता वृषाली गाडेकर  यांनी प्लॅन-नॉन प्लॅनची तब्बल 90 कोटीची (लेखाशिर्ष 5054/03 - 5054/04, नाबार्ड व रस्त्याची डागडुजी म्हणजे खड्डे भरणे) देयके मार्च अखेरपर्यंत अदा  केली, तर पश्‍चिम विभागात शेंडे यांनी याच प्रकारातील 50 कोटींची बिले अदा करून साबांला शेंडी लावली आहे. यासंदर्भात भाजप, संघ परिवारातील काही  जाणकारांसह सामाजिक कार्यकर्ते परमेश्‍वर नलावडे यांची सविस्तर मुलाखत उद्याच्या अंकात-
विशेष ः फुलब्री उपविभागात सर्व्हेची कामे मजूर संस्थाच्या नावे तुकडे पाडून (स्पिलटप) करण्यात आले. मा. मुख्यमंत्री व सेवानिवृत्त अतिरिक्त साबां. सचिव  श्री.आनंद कुलकर्णी यांनी भ्रष्टाचार रोखण्यासाठी पाऊलं उचलून एक वेगळा पायंडा पाडण्याचे दृष्टीने मोठ्या कामाचे व एकाच कामाचे तुकडे (स्पिलटप) करू नये  असा आदेश काढला होता. परंतु फुलब्री उपविभागात सर्वेच्या कामाचे तुकडे पाडण्यात आले. औरंगाबाद मंडळ अंतर्गत तात्कालिन कार्यकारी अभियंता श्री.पी.के.  पाटील यांनी कामाचे (स्पिलटप) केल्यामुळे औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. खंडपीठाने राज्य शासनाला श्री.पी.के पाटील यांचेवर  कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. परंतु राज्य शासनाने (माजी मंत्री इडीग्रस्त) भुजबळांनी भ्रष्टाचाराला साथ दिल्याने श्री.पी.के. पाटील यांचेवर आज तगायत  कार्यवाही करण्यात आलेली नाही. हे सरकारची नामुष्की नाही तर काय सा.बां. सचिवांनी त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.