पुण्यासह सोलापूरमध्ये मान्सुनपूर्व पाऊस
पुणे, दि. 01 - पुणे-पिंपरी चिंचवड शहरासह सोलापूरमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला बुधवारी सांयकाळी सुरूवात झाली. पावसाला सुरवात झाल्यामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले असून, सुगंध दरवळू लागला आहे.
दुपारनंतर आकाशात ढग जमा होऊ विजांचा कडकडाट सुरू झाला होता. पुणे शहरासहर परिसरामध्ये सायंकाळी पावसाला सुरवात झाली. विविध इमारतींवर चिमुकल्यांसह नागरिक भिजण्याचा आनंद लुटताना दिसत आहेत. गरम झालेल्या रस्त्यांवरून पाणी वाहू लागले आहे. वाहन चालक रस्त्याच्या कडेला उभे राहून पावसाचा आनंद घेत आहेत. कमाल तापमानात गेल्या काही दिवसांत सातत्याने घट होत असल्याने राज्यातील उष्णतेची लाट ओसरली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मेघगर्जना विजांसह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता.
पूर्वमोसमी पाऊस पडण्यास अनुकूल वातावरण तयार होत असल्याने राज्यात तुरळक ढग जमा होत आहेत. राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडत आहे. मंगळवारी (ता. 31) सातारा जिल्ह्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. अंदमान निकोबार बेटांसह कर्नाटक, केरळ आणि लक्षद्वीप बेटांवर जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, नैर्ऋत्य मोसमी वार्यांनी (मॉन्सून) अद्याप अपेक्षित वेग पकडला नाही. साधारणत: 1 जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होणारा मॉन्सून यंदा अंदमान बेटांच्या पुढे सरकलेला नाही. बंगालच्या उपसागरावरील शाखेने 20 मे रोजी संपूर्ण अंदमान व्यापल्यानंतर 11 दिवसांत मॉन्सूनने कोणतीही प्रगती केलेली नाही. मॉन्सूनचे केरळातील आगमन लांबणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. पुढील वाटचालीसाठी पोषक वातावरणीय घटक तयार होण्याची प्रतीक्षा कायम आहे.